दर गुरुवारी भरणार वासुंबेत आठवडी बाजार

प्रतिष्ठा न्यूज/किरण कुंभार
तासगाव : वासुंबे येथे गावातील ग्रामस्थांची बाजाराच्या निमित्ताने होणारी गैरसोय दूर करण्यासाठी ग्रामपंचायतच्या विशेष पुढाकारने शेतकरी उत्पादक गट व व्यापारी तसेच महिला बचत गट यांच्या माध्यमातून गुरुवार पासून आठवडी बाजार सुरू करण्यात आला.शेतकऱ्यांचा माल थेट बाजारात पोहचावा यासाठी ग्रामपंचायतने पुढाकार घेतला.याचे उदघाटन उपस्थित असणाऱ्या महिला भगिनींच्या हस्ते करण्यात आले.यावेळी लोकनियुक्त सरपंच जयंत पाटील,ग्रा.प.सदस्य जेष्ठ नेते बाळासाहेब एडके,सदस्य डॉ.विकास मस्के,सदस्य शीतल हाक्के,महेश पाटील,अमर पांढरे,संतोष कोळेकर,वैभव चोपडे,सूर्यकांत गेंड,अनिल एडके त्याच बरोबर महिला भगिनी,शेतकरी बंधू तसेच गावतील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.पहिल्याच दिवशी उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाल्याने भाजीपाला विक्रेते यांच्या कडून समाधान व्यक्त केले गेले.त्याच बरोबर ग्रामस्थांनी ग्रामपंचायत लोकप्रतिनिधी यांचे आभार व्यक्त केले.दर गुरुवारी सायंकाळी 4 नंतर बाजार भरणार आहे.



