दक्षता व नियंत्रण समितीची आढावा बैठक संपन्न

प्रतिष्ठा न्यूज
सांगली, दि. 07: अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती अत्याचार प्रतिबंध अधिनियम 1989 अंतर्गत जिल्हा दक्षता व नियंत्रण समितीची आढावा बैठक जिल्हाधिकारी अशोक काकडे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बैठक कक्षात झालेल्या या बैठकीस अप्पर पोलीस अधीक्षक कल्पना बारवकर, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. विक्रमसिंह कदम, सर्व उपविभागीय अधिकारी, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. विजयकुमार वाघ, जिल्हा माहिती अधिकारी संप्रदा बीडकर, नागरी हक्क संरक्षण पथकाच्या एस. व्ही. वागलगावे, समाज कल्याण अधिकारी योगेश मगदूम, सहाय्यक पोलीस निरीक्षक पंकज पवार आदि उपस्थित होते.
यावेळी जिल्हाधिकारी अशोक काकडे यांनी जिल्ह्यातील अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती अत्याचार प्रतिबंध कायद्याअंतर्गत दाखल प्रकरणांचा, पोलीस विभागाकडील प्रलंबित प्रकरणे, जातीच्या दाखल्याची प्रलंबित प्रकरणे, समाज कल्याण विभागाकडे प्राप्त प्रकरणे, तक्रारी आदिंचा आढावा घेतला.
यावेळी योगेश मगदूम यांनी प्रलंबित प्रकरणे, मागील इतिवृत्त, पोलीस विभागाकडील प्रलंबित प्रकरणे याचा आढावा समितीसमोर दिला.