प्रतिष्ठा न्यूज

सर्वोच्च न्यायालयाने भटकी कुत्री सार्वजनिक ठिकाणाहून तातडीने हटवा या दिलेल्या आदेशाची तातडीने अंमलबजावणी करा.अन्यथा महापालिकेत भटकी कुत्री सोडणार-माजी आमदार नितीन शिंदे

प्रतिष्ठा न्यूज
सांगली प्रतिनिधी : सांगली महापालिका क्षेत्रामध्ये भटक्या कुत्र्यांनी व जनावरांनी अक्षरशः धुमाकूळ घातला आहे.हजारोच्या संख्येने असणाऱ्या भटक्या कुत्र्यानी वृद्ध महिला,वाहन चालक व बालक यांच्यावर हल्ले चढवली जात आहेत. काहींना यांच्या हल्ल्यात प्राण ही गमवावा लागला आहे.ही भटकी कुत्रे संपूर्ण महापालिका क्षेत्रात घाण करत आहेत.तसेच गाड्यांचे नुकसान करीत आहे.या विरोधामध्ये काही महिन्यापूर्वी हिंदू एकता आंदोलनाने सांगली महापालिकेच्या आयुक्त यांना भेटून निवेदन दिले होते,व या भटक्या कुत्र्यांना पकडून महापालिकेच्या वतीने तातडीने “निवारा केंद्र बांधून” त्यामध्ये त्यांना कोंडून अशी मागणी केली होती.अशी मागणी केली होती. यावर महापालिकेचे आयुक्त यांनी समडोळी रोडवरील कचरा डेपो जवळ असलेल्या महापालिकेच्या भूखंडावर निवारा केंद्र बांधून कुत्र्यांना पकडून त्या निवारा केंद्रामध्ये बंदिस्त करून भटक्या कुत्र्यांचा प्रश्न मार्गी लावू असा शब्द दिला होता. त्याचेपुढे झाले काय आता सर्वोच्च न्यायालयाने भटकी कुत्री सार्वजनिक ठिकाणाहून हटवून त्यांची ‘नसबंदी’ करून त्यांना पाळीव प्राणी निवारा घरात हलवावे असे आदेश सर्व राज्याने दिले आहे.त्याची अंमलबजावणी महापालिकेने तातडीने करावी अन्यथा सांगली महापालिका हद्दीतील भटकी कुत्रे पकडून महापालिकेच्या आवारात आणून सोडण्यात येतील असा इशारा माजी आमदार नितीन शिंदे व माजी नगरसेविका ॲड.स्वाती शिंदे यांनी दिले.

Related Articles

Back to top button
Don`t copy text!