भाजपा सांगली जिल्हा महिला मोर्चा अध्यक्षपदी स्वाती खाडे यांची निवड

प्रतिष्ठा न्यूज / योगेश रोकडे
सांगली : भारतीय जनता पार्टी सांगली जिल्हा महिला मोर्चा अध्यक्षपदी स्वाती खाडे यांची निवड करण्यात आली आहे. त्या एमटीडीके शैक्षणिक संकुल च्या मुख्य कार्यकारी अधिकारी तसेच माजी कॅबिनेट मंत्री तथा पालकमंत्री सांगली जिल्हा, आ. डॉ . सुरेशभाऊ खाडे यांच्या स्नुषा ( सुनबाई) आहेत. संघटनेच्या वरिष्ठ नेतृत्वाने त्यांच्यावर विश्वास व्यक्त करून ही जबाबदारी सोपवली आहे.
स्वाती खाडे या गेल्या अनेक वर्षांपासून समाजकार्यात सक्रिय असून महिलांच्या सक्षमीकरणासाठी त्यांनी विविध उपक्रम राबवले आहेत. त्यांचे नेतृत्व, संघटन कौशल्य आणि सामाजिक भान लक्षात घेऊन त्यांची निवड करण्यात आली आहे.
या निवडीबद्दल त्यांचे विविध स्तरावरून अभिनंदन होत असून, महिला मोर्चाला नवसंजीवनी मिळेल, असा विश्वास पक्षातील कार्यकर्त्यांनी व्यक्त केला आहे.
“महिला सक्षमीकरण, जनसंपर्क आणि संघटन विस्तार हाच माझा प्राधान्यक्रम असेल,” तसेच ही जबाबदारी म्हणजे केवळ सन्मान नसून सेवेचे व्रत आहे. असे निवडीनंतर स्वाती खाडे यांनी सांगितले. या नियुक्तीमुळे जिल्ह्यातील महिला कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.



