प्रतिष्ठा न्यूज

तासगाव येथे वंदे मातरम शताब्दी महोत्सव सोहळा उत्साहात साजरा

प्रतिष्ठा न्यूज/किरण कुंभार
तासगाव : येथील स्वातंत्र्य सेनानी भाई गणपतरावं कोळी बहुउद्देशीय हॉल याठिकाणी वंदे मातरम शताब्दी महोत्सव सोहळा आबासाहेब गरवारे शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेने महाराष्ट्र शासनाच्या आदेशाने पार पाडला.यावेळी विविध शासकीय कार्यालयातील अधिकारी,कर्मचारी तसेच सैनिक स्कूल आनंद सागर स्कूल तसेच विविध शाळेतील बाराशे मुला मुलींची व शिक्षकांची उपस्थिती होती.कार्यक्रमाची  सुरुवात दीप प्रज्वलन व प्रतिमापूजन होऊन झाली.यावेळी मुल्ला सर यांनी स्वागत व प्रस्तावीक केले,यावेळी रामा वेल्हाळ  व सहकारी मुला मुलीनी वंदे मातरम सामुदायिकपणे म्हटले.सुरुवातीला सर्व उपस्थित अधिकारी व सदस्यांचे स्वागत करण्यात आले. कार्यक्रमाचे अध्यक्ष नायब तहसीलदार प्रकाश बुरुंगले यांचे अध्यक्षीय भाषण पार पडले.यावेळी त्यांनी वंदे मातरम संदर्भात शासनाची भूमिका विशद केली,यावेळी कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते ईश्वर रामण्णवर यांनी अगदी सोप्या पद्धतीने सोप्या भाषेत वंदे मातरम् बद्दलची माहिती विशद करून उपस्थित सर्वांचे मने जिंकली. यावेळी तासगाव नगरपालिकेचे  मुख्याधिकारी सुधाकर लेंडवे गटविकास,अधिकारी अविनाश पाटील,गटशिक्षण अधिकारी प्रदीप चव्हाण,प्राचार्य श्रीमती एमडी जोशी, शासकीय नियुक्त आय एम सी संस्था (व्यवस्थापन समिती सदस्य) अमोल बोळाज,प्रवीण देवकर,अशोक मासाळे उपस्थित होते.हा वंदे मातरम शताब्दी सोहळा कार्यक्रम व्यवस्थितरित्या पार पाडण्यासाठी शासनाच्या वतीने व्यवस्थापन समिती गठीत करण्यात आली होती. यामधील उपस्थित सदस्य जगदीश कालगावकर, सामाजिक कार्यकर्ते तथा पत्रकार राहुल कांबळे, साहित्यिक प्रा.वासुदेव गुरव सर,उद्योजक प्रतिनिधी भालचंद्र बुरांडे,क्रीडापटू अमित पवार,बचत गट प्रतिनिधी सौ संध्या पाटील,गड किल्ले संवर्धन प्रतिनिधी अक्षय हिंगमिरे,शिक्षण संस्था प्रतिनिधी सतीश देवकरे,संजय  राजमाने,सूर्यकांत देवकुळे,पोतदार,कौशल्य विकास सांगलीच्या दीपिका आरगे इत्यादी उपस्थित होते.यावेळी गरवारे शासकीय वैद्यकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे वतीने श्रीमती जोशी मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व शिक्षक व इतर कर्मचारी यांनी वंदे मातरम् शताब्दी सोहळा अत्यंत निटनेटक्या पद्धतीने आयोजन करून पार पाडला यासाठी एस आय मुजावर यांनी आभार व्यक्त केले.

Related Articles

Back to top button
Don`t copy text!