खाडे शैक्षणिक संकुलच्या संस्थाचालकांनी आपल्या मुलाचा वाढदिवस सालाबादप्रमाणे स्तुत्य उपक्रमाने साजरा

प्रतिष्ठा न्यूज / योगेश रोकडे
मिरज : दास बहुउद्देशीय विश्वस्त संस्था सांगली संचलित एमटीडीके शैक्षणिक संकुल मधील सचिव सुशांत खाडे व मुख्य कार्यकारी अधिकारी स्वाती सुशांत खाडे या दांपत्याने त्यांचा मुलगा श्लोक सुशांत खाडे याचा वाढदिवसाचा अनावश्यक खर्च कमी करत सालाबादप्रमाणे, शैक्षणिक संकुल मधील सर्व विद्यार्थ्यांसाठी आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन केले. यामध्ये दंत, डोळे, तसेच नियमित आरोग्य तपासणी केली. यातून ज्या विद्यार्थ्यांना विशेष तपासणीची किंवा औषधोपचाराची गरज आहे, अशा पालकांना सूचना देण्यात आल्या. या उपक्रमामुळे बऱ्याच विद्यार्थ्यांना फायदा झाला. तसेच काही पालकांना भविष्यात मुलांना उद्भवू शकणाऱ्या आजाराविषयी या उपक्रमामुळे वेळीच कळल्याने होणारा त्रास व आर्थिक नुकसान टाळण्यास मदत झाली. त्यासाठी पालकांनी या उपक्रमासाठी संस्थाचालकांचे विशेष आभार मानले.
या उपक्रमाचे नियोजन रणधीर पटवर्धन यांनी केले. तसेच युनिक इन्स्टिट्यूट ऑफ क्रिटिकल केअर या अत्याधुनिक आणि वेगाने प्रगती करणाऱ्या वैद्यकीय संस्थेच्या सहकार्याने आयोजित करण्यात आले . हॉस्पिटलचे डॉ. शिरीष चव्हाण, डॉ. परमशेट्टी व डॉक्टर प्राणी यांच्या नेतृत्वात तपासणी शिबिरात , डॉ. धनंजय , डॉ. शिवानंद, डॉ. नाझ, डॉ. मानसी, डॉ. अफजा पटाईत, डॉ. श्रद्धा , डॉ. रवींद्र कलाल डॉ. मयुरी सुतार यांनी मोलाची सेवा बजावली.
या उपक्रमासाठी संस्थेचे अध्यक्ष माजी कॅबिनेट मंत्री तथा पालकमंत्री सांगली जिल्हा आ. डॉ सुरेश भाऊ खाडे, संचालिका सुमनताई खाडे यांचे मार्गदर्शन लाभले. तसेच मुख्याध्यापिका संगीता पाटील, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांचे मोलाचे सहकार्य मिळाले.