चिंतामणराव व्यापार महाविद्यालयाच्या बॅडमिंटन खेळाडूंची क्रीडा महोत्सव स्पर्धेसाठी निवड

प्रतिष्ठा न्यूज/ योगेश रोकडे
सांगली प्रतिनिधी : शिवाजी विद्यापीठ अंतर्गत आंतर विभागीय पुरुष बॅडमिंटन स्पर्धा अण्णासाहेब डांगे कॉलेज ऑफ इंजीनियरिंग आष्टा या ठिकाणी संपन्न झाल्या या स्पर्धेमध्ये चिंतामणराव व्यापार महाविद्यालयाच्या संघाने द्वितीय क्रमांक मिळविला व संघातील रुद्र उमराणीया बी.बी.ए.भाग २ व प्रीत परशेट्टी बी.कॉम.भाग २ यांची महाराष्ट्र राज्य अंतर विद्यापीठ क्रीडा महोत्सव स्पर्धा दिनांक 4 ते 8 डिसेंबर 2025 रोजी स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड येथे दोघांची निवड शिवाजी विद्यापीठ संघात झाली असून त्यांचा सत्कार करताना महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ .सुरेश कुंभार, डेक्कन एज्युकेशन सोसायटी आजीव सदस्य श्री नारायण आपटे, श्री.आशिष पुराणिक,जिमखाना समिती अध्यक्ष डॉ.शार्दुल ठाकूर, डॉ. महेंद्र बागुल, डॉ.विजय साळुंखे, श्री.अनिल खर्चे,श्री.अविनाश पवार, श्री.प्रसन्न कुलकर्णी उपस्थित होते सदर खेळाडूंना डेक्कन एज्युकेशन सोसायटी सांगली विभागीय अध्यक्ष डॉक्टर विश्राम लोमटे, सदस्य श्री.रवींद्र ब्रम्हणाळकर कॅम्पस डायरेक्टर डॉ.सचिन खेडेकर यांचे प्रोत्साहन लाभले तर महाविद्यालयातील शारीरिक शिक्षण संचालक डॉ.गणेश सिंहासने क्रीडा शिक्षक श्री .दत्तात्रय मुळक यांचे मार्गदर्शन लाभले.