प्रतिष्ठा न्यूज

तासगाव बाजार समितीची मासिक सभा संपन्न

प्रतिष्ठा न्यूज/किरण कुंभार
तासगाव : कृषि उत्पन्न बाजार समिती तासगांवची मासिक सभा शनिवार दिनांक २९/११/२०२५ रोजी दुपारी १.०० वाजता पार पडली.सदर सभेमध्ये बाजार समितीचे संचालक  खंडू उर्फ रामचंद्र विठ्ठल पवार रा. मणेराजूरी यांची सांगली जिल्हा रुरल चेबर ऑफ कॉमर्स ऑफ इंडीयाच्या जिल्हा अध्यक्षपदी निवड झालेबद्दल जाहिर सत्कार घेणेत आला. त्याप्रसंगी बाजार समितीचे माजी सभापती व सध्या विद्यमान संचालक अनिल विश्वासराव पाटील,यांनी सत्कार समारंभ प्रसंगी अभिनंदनचा ठराव मांडला.त्यामध्ये खंडू उर्फ रामचंद्र विठ्ठल पवार यांनी त्यांचे सांगली जिल्हा रुरल चेबर ऑफ कॉमर्स ऑफ इंडीयाच्या जिल्हा अध्यक्षपदीच्या भावी कारर्किदिस शुभेच्छा देण्यात आल्या.त्याचबरोबर सभापती,उपसभापती व सर्व संचालक यांनीही शुभेच्छा दिल्या व सभापती युवराजदादा उर्फ सुनिल भानुदास पाटील यांचे हस्ते शाल श्रीफळ व बुके देवून सत्कार करणेत आला.सदर सत्कारप्रसंगी बाजार समितीचे युवराजदादा उर्फ सुनिल भानुदास पाटील सभापती,रामचंद्र सत्तू जाधव,उपसभापती,त्यांचप्रमाणे संचालक संग्राम आबासो पाटील, दत्तात्रय भिमराव थोरबोले,अनिल विश्वासराव पाटील,सौ.विजया शंकर पाटील,सौ.रेखा रविंद्र पाटील,अंकुश सदाशिव माळी,मुकूंद सुबराव ठोंबरे. अवधूत सुभाष शिंदे,राजाराम गुंडा पाखरे,धनाजी नारायण पाटील, सुदाम लक्ष्मण माळी.कुमार रामचंद्र शेटे,सुरेश मारुती बेले,व सर्व कर्मचारी वर्ग.उपस्थित होते.

Related Articles

Back to top button
Don`t copy text!