प्रतिष्ठा न्यूज

पुस्तकपरीक्षण स्पर्धेत शशिकांत पाटील तासगाव तालुक्यात प्रथम कोल्हापूर विभागीय स्पर्धेसाठी निवड

प्रतिष्ठा न्यूज
सांगली प्रतिनिधी : महाराष्ट्र शासनाने शिक्षण विभागातील शिक्षक- अधिकारी व कर्मचाऱ्यांना आनंददायी वातावरणात शैक्षणिक कामकाज करता यावे व त्यांच्या कुलागुणांना संधी मिळावी यासाठी तालुका,विभाग व राज्यस्तरावर विविध वैयक्तिक व सांघिक स्पर्धा आयोजित करण्यात आल्या आहेत.

जागृती अध्यापक विद्यालय येथे पुस्तक परीक्षण स्पर्धा मुख्य परीक्षक लालासो माळी,प्राचार्य शर्मिष्ठा अंबवडे,विषयतज्ञ स्वाती पाटील,अर्चना बेले,सुरेखा राजगे यांच्या उपस्थितीत पार पडल्या. हिंदवी स्वराज्याचे तिसरे छत्रपती राजाराम महाराज यांची पराक्रम गाथा सांगणारे अपरिचित, सचिन कानिटकर यांचे ऐतिहासिक दुर्मिळ पुस्तक ‘वादळधुरा’ पुस्तक परीक्षण व सादरीकरण केलेले महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद प्राथमिक विभागाचे सांगली जिल्हाध्यक्ष व पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष शशिकांत पाटील यांचा प्रथम क्रमांक आला व त्यांची कोल्हापूर विभागीय स्पर्धेसाठी निवड झाली.

शिक्षणाधिकारी माध्यमिक राजेसाहेब लोंढे, शिक्षणाधिकारी प्राथमिक मोहनराव गायकवाड, सांगली डायटचे प्राचार्य विकास सलगर,वरिष्ठ अधिव्याख्याता सुरेश माने,रेणुका जाधव, स्पर्धा विभाग प्रमुख सुलभा पुजारी यांचे जिल्हा स्तरावरून मार्गदर्शन कविता, विश्लेषण, फोटोग्राफी, एम एस वर्ल्ड, एक्सेल, पावरपॉइंट, लोकनृत्य, रांगोळी, वक्तृत्व, प्रवासवर्णन, वाद्यवादन, सुलेखन, कथाकथन, शोधनिबंध, प्रश्नमंजुषा, कथाकथन, वाद-विवाद शैक्षणिक साहित्य निर्मिती, हॅकॅथॉन, नाट्य, योगासन आत्मचरित्र, ओलंपियाड या स्पर्धांसाठी मार्गदर्शन लाभत आहे.

तासगाव प्रभारी गटशिक्षणाधिकारी प्रदीप चव्हाण,विस्ताराधिकारी शंकर पवार, बी आर सी विषय तज्ञ वैभव आंबी,वैभव बंडगर,आशिष भंडारे,नितीन रास्ते,अमोल कोळेकर,मनोज आवटी,वर्षा जाधव,सुरेखा राऊत,धनश्री माळी,मीनाक्षी शितोळे,स्वाती देवांग,पुनम जाधव हे सर्व तालुका स्तरावर स्पर्धा यशस्वीतेसाठी झटत आहेत.मूल्यवर्धन जिल्हा समन्वयक विकास शेळके,तालुका समन्वयक धनंजय पाटील,दयानंद घाडगे,नलिनी हजारे,सुप्रिया वन्ने,इमरान शेख यांनी शशिकांत पाटील यांचे अभिनंदन केले.

प्रभारी व कार्यरत केंद्रप्रमुख अमोल केंगार, अण्णासाहेब गायकवाड, वंदना कदम,जयश्री पाटील,उत्कला सागरे,मुनाफ नदाफ,रवी खरमाटे,तानाजी चव्हाण,उदय रकटे,विठ्ठल धेंडे विजेत्या शिक्षकांची राज्यस्तरीय स्पर्धेसाठी तयारी करून घेत आहेत. पुस्तक परीक्षण स्पर्धेचे राज्यस्तरीय आयोजन जिजाऊ मासाहेबांच्या जन्म ठिकाणी बुलढाणा येथे होणार असल्याचे जिल्हाध्यक्ष तथा पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष श्रीकांत पाटील यांनी सांगितले.