प्रतिष्ठा न्यूज

गुलाबरावपाटील होमिओपॅथिक मेडीकल कॉलेजच्या वतीने जागतिक एडस दिन साजरा

प्रतिष्ठा न्यूज / योगेश रोकडे 
मिरज दि. २ : गुलाबराव पाटील रेड रीबन क्लब आणि जिल्हा एडस प्रतिबंध व नियंत्रण कक्ष, सांगली यांच्या संयुक्त विद्यमानाने दिनांक १ डिसेंबर २०२५ रोजी जागतिक एडस दिनानिमीत्त रॅली व फ्लेश मॉबचे एचआयव्ही प्रतिबंधासाठी जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्याचे प्रातिनिधीक सादरीकरण पद्मभूषण वसंतदादा स्मारक, स्टेशन चौक, सांगली येथे सादर करण्यात आले. यावेळी सांगलीकरांनी भरभरुन दाद देत या उपक्रमाचे कौतुक केले.

गुलाबराव पाटील होमीओपॅथीक कॉलेजच्या रेड रिबीन क्लबचे चेअरमन प्राचार्य डॉ. राजेंद्र मेथे, व्हा. चेअरमन डॉ. वैशाली सावंत, डॉ. सेजल माळी व डॉ. शितलकुमार पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम पार पडला. बीएचएमएस चे विद्यार्थी/ विद्यार्थीनी एचआयव्हीचा प्रसार प्रतिबंध आणि प्रतिबंधात्मक उपाय यावर सामुहीक नृत्य नाटक सादर केले. महाविद्यालयीन विद्यार्थी व युवा वर्गात अजूनही एचआयव्हीबाबत जागरूकता होणे अत्यंत आवश्यक आहे व त्यासाठी या फ्लेश मॉबचे आयोजन आरोग्य प्रबोधनाच्या दृष्टीने खूपच प्रभावी ठरले. यावेळी डॉ. विक्रमिसिंह कदम, जिल्हा शल्य चिकित्सक सांगली व डॉ. विजयकुमार वाघ यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन विद्यार्थ्यांचे कौतूक व सत्कार करण्यात आला. संस्थचे संस्थापक चेअरमन पृथ्वीराज पाटील, विश्वस्त विरेंद्रसिंह पाटील व कैंपस को-ऑर्डिनेटर डॉ. सतीश पाटील यांचे कार्यक्रमास मार्गदर्शन व प्रोत्साहन मिळाले.

Related Articles

Back to top button
Don`t copy text!