प्रतिष्ठा न्यूज

मराठा उद्योजकांचे महा अधिवेशन नाशकात उत्साहात; बाराशे उद्योजकांची उपस्थिती तर ऑनलाईन सात लाख उद्योजकांचा सहभाग

मराठा उद्योजक विकास आणि मार्गदर्शन संस्थेचे आयोजन

प्रतिष्ठा न्यूज
नाशिक प्रतिनिधी : नाशिक येथील कालिदास कला मंदिर येथे मराठा सेवा संघ प्रणित मराठा उद्योजक विकास आणि मार्गदर्शन संस्था महाराष्ट्र,नाशिक जिल्हा शाखेच्या वतीने मराठा उद्योजकांचे राज्य पातळीवरील पहिले ऐतिहासिक मराठा उद्योजक महाअधिवेशन मोठ्या उत्साहात पार पडले. राज्यभरातील छोट्या उद्योजकांपासून ते पाच हजार कोटीहून जास्त उलाढाल असणाऱ्या  सुमारे १२०० मराठा उद्योजकांनी यामध्ये सहभाग घेतला. तर विविध समाजमाध्यमातून सुमारे सात लाख उद्योजकांनी ऑनलाईन सहभाग घेतला.

संस्थेचे प्रदेशाध्यक्ष राजेंद्रसिंह पाटील व नाशिक जिल्हाध्यक्ष इंजी.विशाल देसले यांच्यसह राज्यभरातील उद्योजकांनी अधिवेशनाचे नेतृत्व केले. स्वागताध्यक्ष प्राचार्य प्रशांत पाटील, जिल्हाध्यक्ष राजेंद्र निंबाळते, जिजाऊ ब्रिगेडच्या प्रदेशाध्यक्ष माधुरी भदाणे, मराठा सेवा संघाचे विभागीय अध्यक्ष दीपक भदाणे यांचे मोलाचे सहकार्य लाभले. सकाळी झालेल्या उद्घाटन सत्रात केंद्रीय उद्योग मंत्रालयाचे अतिरिक्त सचिव डॉ.सचिन भदाणे यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मराठा सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष इंजी.पुरुषोत्तम खेडेकर, संस्थापक सचिव निर्मलकुमार देशमुख, अपर्णा देशमुख, मार्गदर्शक इंजी. एस.आर.पाटील, उषामाई पाटील, प्रदेशाध्यक्ष डॉ.विजयकुमार घोगरे, प्रदेश कार्याध्यक्ष प्रा.अर्जुनराव तनपुरे, प्रदेश उपाध्यक्ष इंजी.के.डी.पाटील, अरविंद गावंडे, अशोक महल्ले, सचिव सोमनाथ लडके, उद्योजक कक्षाचे प्रदेशाध्यक्ष राजेंद्रसिंह पाटील, जिल्हाध्यक्ष इंजी. विशाल देसले, स्वागताध्यक्ष प्राचार्य प्रशांत पाटील, हावरे गृपचे संचालक नवी मुंबईचे डॉ.सुरेश हावरे, बि.वि.जी गृपचे संचालक हणमंतराव गायकवाड, राजदीप इन्फ्राचे संचालक जगदीश कदम, उद्योग सल्लागार डॉ.प्रकाश भोसले, ईशवेद बायोटेकचे संचालक संजय वायाळ, शुभम वॉटर पार्क तथा फ्लॉवर पार्कचे संचालक शशिकांत जाधव, चिंतामणी मोटर्सचे संचालक उज्वल साठे, उद्योजक इंजी.अविनाश पाटिल, स्टार्टअप प्रशिक्षक आणि व्यवस्थापक निखिल देवरे, विभागीय महसुल उपायुक्त संजय काटकर व रमेश काळे, उपजिल्हाधिकारी महेंद्र पवार, सभागृह नेते दिनकर पाटील, बाळासाहेब पाटील, जिजाऊ ब्रिगेडच्या प्रदेशाध्यक्ष माधुरी भदाणे, जिल्हाध्यक्ष व उद्योजक कक्षाच्या मालेगाव तालुकाध्यक्ष इंजी.शिल्पा देशमुख, विभागीय उपाध्यक्ष सुमन हिरे, सिन्नर तालुकाध्यक्ष कल्पना रेवगडे,मराठा सेवा संघाचे विभागीय अध्यक्ष दीपक भदाणे, जिल्हाध्यक्ष राजेंद्र निंबाळते,नितिन मगर, इंजी.जितेंद्र पाटील, इंजी.नितीन पाटील व महाराष्ट्रभरातून विविध पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या सुरुवातीस छत्रपती शिवाजी महाराज,राष्ट्रमाता जिजाऊ यांचे पूजन करून कार्यक्रमास सुरुवात झाली. यावेळी *कुमारी उत्कर्षा विशाल देसले हिने जिजाऊ वंदना सादर करत मंत्रमुग्ध केले. तिला सर्वेश विशाल देसले आणि रेवांश कुणाल देसले यांनी साथ दिली. यावेळी तुमच आमच नात काय? जय जिजाऊ जय शिवराय! रक्तारक्तात भिनलय काय? जय जिजाऊ, जय शिवराय! या घोषणांनी परिसर दुमदुमून गेला होता. राज्यभरातून सर्व व्यावसायिक व उद्योजक यांच्यात चैतन्य निर्माण करणारा हा प्रसंग डोळ्यांचे पारणे फेडणारा होता.

जिल्हाध्यक्ष इंजी.विशाल देसले यांनी प्रास्ताविकातून नाशिक मॉडेलची माहिती दिली व आगामी काळात रेफरन्स आणि सॉफ्ट स्किल डेव्हलपमेंट वर काम केले जाईल असे सांगितले. तसेच महाअधिवेशनाचा जास्तीत जास्त फायदा घेण्यासाठी मौलिक  सूचना दिल्या.
अधिवेशनाचे उद्घाटक केंद्रीय उद्योग मंत्रालयाचे अतिरिक्त सचिव डॉ.सचिन भदाणे यांनी ग्रामीण भागातील शेतकऱ्यांच्या आर्थिक दृष्ट्या विकास साधायचा असेल तर त्याला अगोदर उद्योग साक्षर व्हावे लागेल. यासाठी केंद्राच्या अनेक योजना आहेत. आर्थिक सक्षम नसलेल्या शेतकऱ्यांना सूक्ष्म, मध्यम आणि लघु प्रकल्पांचे अनुदान असल्याने या योजनेचा लाभ घेतला तर कोणत्याही शेतकऱ्याला नुकसान झाले असे म्हणण्याची वेळ येणार नसल्याचे सांगितले.

प्रदेशाध्यक्ष राजेंद्रसिंह पाटील यांनी उद्योग व व्यवसायाला गती देत राज्यभर उद्योजक कक्षाच्या माध्यमातून विस्तार केला जाईल असे सांगितले.

स्वागताध्यक्ष प्राचार्य प्रशांत पाटील यांनी आगामी काळात कौशल्य विकासाला मोठी संधी असून या कार्यक्रमांतर्गत मोठ्या प्रमाणावर तरुणांना रोजगार उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले.
लोकनेते दिनकर पाटील यांनी समाजाच्या कोणत्याही उपक्रमात यापुढील काळात सक्षमपणे उभे राहण्याचे आश्वासन दिले.
अक्षर मानव संस्थेचे अमित पाटील दिग्दर्शित सफरचंद या चित्रपटाचे हलगी वादन करत प्रमोशन करण्यात आले. यावेळी चित्रपटाचे सर्व कलाकार उपस्थित होते.

सत्राचे अध्यक्ष आणि मराठा सेवा संघाचे प्रदेशाध्यक्ष इंजी.विजय घोगरे* यांनी समाजाला आर्थिक बळकटी येण्यासाठी उद्योग व्यवसायावर भर दिला जाईल असे सांगितले.

दुसऱ्या सत्रातून हावरे बिल्डरचे व्यवस्थापकीय संचालक डॉ.सुरेश हावरे यांनी “उद्योग तुमचा पैसा दुसऱ्याचा”* या विषयावर बोलतांना उद्योगाची अनेक क्षेत्र खुले आहेत. मात्र त्याची माहिती नसल्यामुळे अडचणींना सामोरे जावे लागत असल्याचे सांगितले.
उद्योग सल्लागार डॉ.प्रकाश भोसले यांनी “जगाला शिव प्रेरणा देणाऱ्या शिवरायांची उद्योगनीती” या विषयावर बोलतांना शिवरायांचे पैलू उद्योग क्षेत्रात कसे उपयोगी पडतील याविषयी मार्गदर्शन केले.
मराठा सेवा संघाचे विभागीय अध्यक्ष दीपक भदाणे यांनी समाजात विठ्ठल खूप आहेत. ते शोधता आले पाहिजेत असे सांगत जिल्हा उद्योजक कक्षात अनेक विठ्ठल एकत्र आल्यामुळे मोठे अधिवेशन घेता आले.त्याचा मला सर्वस्वी अभिमान वाटत असल्याचे सांगितले.

उद्योगविश्व काल, आज आणि उद्या या तिसऱ्या सत्रात शून्यातून विश्व निर्माण करणाऱ्या यशस्वी उद्योजकांशी (पॅनल डिस्कशन) संवाद आयोजित करण्यात आला होता. या सत्रात राजपथ इन्फ्राचे संचालक जगदीश कदम, बीव्हीजी ग्रुपचे व्यवस्थापकीय संचालक हणमंतराव गायकवाड, बायोटेकचे ईशवेद व्यवस्थापकीय संचालक संजय वायाळ पाटील, शुभम वाटर पार्क व नाशिकच्या प्रसिद्ध फ्लावर पार्कचे संचालक तथा प्रसिद्ध उद्योजक शशिकांत जाधव यांच्या मुलाखती चिंतामणी मोटर्सचे व्यवस्थापकीय संचालक उज्वल साठे यांनी घेतल्या. सहभागी सर्व उद्योजकांच्या आयुष्यातील अनेक पैलूंना स्पर्श करत अतिशय सर्वसामान्य कुटुंबात जन्म घेत उद्योग शिखरावर कसे पोहोचले ? उद्योगात यशस्वी होण्यासाठी काय गरजेचे आहे ? याविषयी या चर्चेतून फलनिष्पत्ती झाली.
चौथ्या सत्रात डिजिटल स्क्वेअर चे व्यवस्थापक प्रशिक्षक इंजी.निखिल देवरे यांनी नवनव्या क्षेत्रात स्टार्टअप च्या माध्यमातून उद्योगात कशी भरारी घेता येईल ? याविषयी मार्गदर्शन केले.

 विविध उद्योग व्यवसायांचा गाढा अभ्यास असणारे पदवीधर मतदारसंघाचे आमदार सत्यजित तांबे यांनी उद्योग व्यवसायातील अनेक क्षेत्रांची माहिती देत संबोधित केले.
समारोपीय सत्रात मराठा सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष इंजी.पुरुषोत्तम खेडेकर यांनी तरुणांनी व्यवसायाच्या उद्योगाच्या कक्षा रुंदावल्या पाहिजेत. डोक्याच्या मॉलिश पासून तर बुटाच्या पॉलीश पर्यंत जो ही धंदा करता येईल त्यात अव्वल स्थानी आपण असणे गरजेचे आहे. त्यासाठी त्या व्यवसायातील कौशल्य आत्मसात करावेत. आपण ठराविक क्षेत्रापुरते सिमित न राहता आपली वर्तुळे मोठी करणे गरजेचे असल्याचे सांगितले. जगातल्या अर्थसत्ता,धर्मसत्ता, राजसत्ता,शिक्षणसत्ता व मीडिया सत्ता हस्तगत कराव्यात. अधिवेशनाला आलेल्या सर्वच  मराठा उद्योजक आणि व्यवसायिकांच्या घरांवर जोपर्यंत ईडीच्या धाडी पडत नाही तोपर्यंत समाज आर्थिक सक्षम झाला असे म्हणता येणार नाही.

 कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रदेशाध्यक्ष राजेंद्रसिंह पाटील,राज्य समन्वयक तानाजीराजे जाधव आणि सुधाकर पाटील, यांच्यासह संपुर्ण राज्य कार्यकारिणी, जिल्हाध्यक्ष इंजी. विशाल देसले, दिपक भदाणे, माधव मुधाळे, उल्हास बोरसे, उमेेश शिंदे,संदीप सोमवंशी, मनोज आमले,इंजी.कुणाल देसले,सुनील घुले,अरविंद देशमुख,बाळासाहेब आंबरे,अमित पवार, मंगेश टरले, आदित्य कडलग, विक्रम कदम, अमोल पाटील, डॉ.संदीप बोरसे, क्रांती बेडसे, सुशांत जाधव, विनायक चव्हाण, चेतन देवरे, आकाश ठाकरे, प्रविण भुसे, विजय पाटील, ज्ञानेश्वर कवडे, अंबिका शिक्षण मंडळ येथील शिक्षकवृंद, कुमारी नुपूर साळुंखे व टीम, राजर्षी शाहू पॉलिटेक्निक येथील विद्यार्थी, मालेगाव तालुकाध्यक्ष इंजी. शिल्पा देशमुख, विभागीय उपाध्यक्ष सुमन हिरे, सिन्नर उपाध्यक्ष कल्पना रेवगडे, चांदवड तालुकाध्यक्ष नितीन गांगुर्डे,नांदगाव तालुकाध्यक्ष विशाल कवडे आदिंनी परिश्रम घेतले.सूत्रसंचालन दिलीप साळुंखे तर आभार उल्हास बोरसे(सि.ए) यांनी मानले.

मराठा उद्योगरत्न 2023 पुरस्कार
उद्योग जगतात यशस्वी भरारी घेणाऱ्या राज्यभरातील मराठा उद्योजकांना ”मराठा उद्योगरत्न पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.
1. निलेश भगवान सांबरे, संस्थापक जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्था,महाराष्ट्र
2. श्रीकृष्ण गांगुर्डे, एव्ही ब्रॉयलर्स, नाशिक
3. विलास शिंदे, सह्याद्री ऍग्रो,नाशिक
4. शशिकांत जाधव, जाधव पॅराडाईज ग्रुप
5. श्रीराम दयाराम पाटील, सीका ई मोटर्स प्रायव्हेट लिमिटेड,जळगाव
6. सचिन सावंत, द्वारकाधीश साखर कारखाना, मालेगाव
7. गजानन वायाळ लोणार, टेकनॉलॉजिस प्रा.ली.पुणे.
8. डॉ.सत्यभामा जाधव, बळीराजा गृहउदयोग, नांदेड.
9. नितीन चव्हाण, गोदा फार्म,हिंगोली.
10. रवि विनायकराव देशमुख, श्रीचक्रधर ग्रुप, अमरावती
11. जयेश टोपे, फॉऊंडर अँड मॅनेजिंग डायरेक्टर रिव्हॅम्प मोटो, नाशिक –
12. सुहास काळे & मेघा सुहास काळे, नागपूर
13. मयूर देशमुख, ऍग्रोवन फर्मीकल्चर,मुंबई
14. डॉ.विजय सावंत, डायरेक्टर ऑफ जे.एस.पी.एम.ग्रुप अँड इबारा ग्रुप ऑफ कंपनीज,पुणे.

 उद्योग मित्र 2023 पुरस्कार 
प्रशासनात राहून उद्योग क्षेत्रात खऱ्या अर्थाने प्रशासकीय सेवक म्हणून अनेक लाभार्थींना मदत करणाऱ्या शासकीय मान्यवरांना उद्योग मित्र पुरस्कार देवून सन्मानित करण्यात आले.
1. नरेंद्र देवरे, जनरल मॅनेजर, बँक ऑफ इंडिया, नाशिक.
2. नितीन गवळी, प्रादेशिक अधिकारी एमआयडीसी नाशिक
3. संदीप पाटील, जनरल मॅनेजर,डी. आय.सी.नाशिक
4. पूजा विठ्ठल पवार सरवदे, डी.वाय.एस.पी. रांजणगाव
5. पल्लवी मोरे, नाशिक विभागीय समन्वयक,आण्णासाहेब पाटील महामंडळ

“उदयोग भूषण 2023” पुरस्कार

1. डॉ.संदीप बोरसे ,  अथर्व डायगोनेस्टीक सेन्टर नाशिक
2. विनायक चव्हाण, गणेश ग्लास अँड अल्युमिनियम,नाशिक
3. आशिष देशमुख, सनफेस सोलर एनर्जी कॉर्पोरेशन,नाशिक
4. अमित पवार, फिनिक्स कॉम्पुटर सिस्टिम्स,नाशिक
5. अरविंद देशमुख & बाळासाहेब आंबरे, अल्फाटेक सिस्टिम्स, नाशिक
6. कमलेश घुमरे, मालेगाव जुगाड
7. डॉ.सारिका पाटिल, बकरी बँक,संदीप फाऊंडेशन नाशिक येथे एम.बि.ए.विभागात प्राध्यापिका

8. सुनील दिगंबर जानुनकर , एस.आर.इंजिनीरिंग, अकोला
~~~~~~~~~~~~

शिक्षण यात्री 2023″ पुरस्कार
1. प्राचार्य तनया शरद भालेराव
के.डी.भालेराव इंटरनॅशनल स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज,लखमापूर,नाशिक
~~~~~~~~~~~~
“युवा उद्योजक 2023” पुरस्कार
1. श्रीराज विक्रम कदम,
संचालक,सात्विक फॅमिली गार्डन रेस्टॉरंट, नाशिक

मराठा सेवा संघासाठी आयुष्य समर्पित  करणाऱ्या इंजी. के.डी.पाटील यांना जीवन गौरव पुरस्कार प्रदान
मराठा सेवा संघाच्या स्थापनेपासून आजपर्यंत समाजासाठी समर्पित असे आयुष्य जगणाऱ्या आणि विविध संस्थांच्या माध्यमातून (लायन्स क्लब,गेम अँड इंडफ,निर्मिती पतसंस्था व विविध सामाजिक संस्थांच्या माध्यमातून) सामाजिक क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मराठा सेवा संघाचे प्रदेश उपाध्यक्ष आणि सेवानिवृत्त कार्यकारी अभियंता इंजी.के.डी.पाटील यांना मराठा उद्योजकांच्या राज्यस्तरीय महाअधिवेशनात मराठा सेवा संंघाचे संस्थापक अध्यक्ष ॲड.पुरुषोत्तम खेडेकर व मराठा विद्या प्रसारक संस्थेचे सरचिटणीस ॲड.नितीन ठाकरे,आमदार सीमा हिरे,आमदार सत्यजित तांबे व विविध उद्योजक यांच्या हस्ते *”जीवनगौरव पुरस्कार” त्यांना सन्मानाने प्रदान करण्यात आला.* त्यावेळेस मराठा सेवा संघाचे प्रदेशाध्यक्ष इंजी.विजय घोगरे,कार्याध्यक्ष प्रा.अर्जुनराव तनपुरे,मराठा उद्योजक आणि मार्गदर्शन संस्थेचे प्रदेशाध्यक्ष राजेंद्रसिंह पाटील,जिजाऊ ब्रिगेडच्या प्रदेशाध्यक्ष शिवमती माधुरी भदाणे, मराठा सेवा संघाचे विभागीय अध्यक्ष दीपक भदाणे,उद्योजक हणमंतराव गायकवाड,जगदीश कदम,शशिकांत जाधव, संजय वायाळ,उज्वल साठे यांच्यासह उद्योग जगतातील बरेचसे मान्यवर उपस्थित होते.
मराठा उद्योजक विकास व मार्गदर्शन संस्थेतर्फे राज्यभरात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या *नाशिक व अमरावती* शाखेस विशेष पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.

महाअधिवेशना निमीत्त *मराठा उद्योजक पर्वणी विशेषांकाचे* प्रकाशन तसेच *मराठा उद्योजक वेबसाईटचेही* अनावरण करण्यात आले.
राज्य राज्यभरातून सुमारे १२०० मराठा उद्योजकांनी उत्स्फूर्तपणे नाव नोंदणी करून उपस्थिती दर्शवली होती.
मराठा उद्योजक कक्षाचे जिल्हाध्यक्ष इंजी.विशाल देसले,प्रदेशाध्यक्ष राजेंद्रसिंह पाटिल यांचे सुक्ष्म नियोजन,प्रदेश कार्यकारिणीचे समन्वयक सुधाकर पाटील,तानाजी राजे मान्यवरांनी संपूर्ण महाराष्ट्रात दौरा करुन महाअधिवेशनासाठी उपस्थित राहण्याचे सूत्रबद्ध नियोजन मोठ्या प्रमाणात नोंदणी केली होती तसेच जिजाऊ ब्रिगेडच्या प्रदेशाध्यक्ष माधुरी भदाणे,मराठा उद्योजक कक्षाच्या मालेगाव तालुकाध्यक्ष इंजी. शिल्पा देशमुख,सिन्नर तालुक्याच्या उपाध्यक्ष कल्पना रेवगडे यांनी महिलांसाठी जिजाऊ ब्रिगेडच्या आणि उद्योजक कक्षा च्या माध्यमातून महिला उद्योजक व व्यावसायिकांसाठी केलेले नियोजन व केलेल्या प्रयत्नामुळेच या महाअधिवेशनाला राज्यभरातून महिला प्रतिनिधी उपस्थित राहू शकले.
राज्यभरातून बाराशे  उद्योजक व व्यावसायिकांनी ऑनलाइन रजिस्ट्रेशन केले असले तरी सदर अधिवेशनाचे लाईव्ह चित्रीकरण फेसबुक तसेच युट्युब वर केले गेल्याने जवळपास सहा ते सात लाख लोकांना अधिवेशन ऑनलाईन बघता आले.

42 Comments