गुंतवणूक सल्लागार सौ. ज्योती शरद चव्हाण यांनी मिळविला एका केसमध्ये एका दिवसात भारतातील पहिल्या एम. डी. आर. टी. होण्याचा बहुमान; अमेरिकेत होणाऱ्या जागतिक परिषदेसाठी झाली निवड
प्रतिष्ठा न्यूज
सांगली प्रतिनिधी : तासगाव येथील गुंतवणूक सल्लागार सौ. ज्योती शरद चव्हाण यांनी दि. १ जानेवारी २०२२-२३ या कॅलेन्डर वर्षात पहिल्याच दिवशी एका केसमध्ये एका दिवसात भारतातील पहिल्या एम. डी. आर. टी. होण्याचा बहुमान मिळविला आहे. जून २०२३ मध्ये अमेरिकेतील नाशव्हिले-टेनसी येथे होणाऱ्या जागतिक परिषदेसाठी त्यांची निवड झाली आहे. जगातील ७० देशांमधून एक टक्केपेक्षा कमी गुतंवणूक सल्लागार या परिषदेसाठी पात्र होतात. यामध्ये ज्योती शरद चव्हाण यांची निवड झाल्याने भारतीय विमा क्षेत्रातुन त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. त्या एच. डी. एफ. सी. लाईफ या कंपनीत विमा गुंतवणूक सल्लागार आहेत.
याबाबत माहिती देताना ज्योती चव्हाण म्हणाल्या, मिलियन डॉलर राउंड टेबल हि संस्था सन १९२७ मध्ये अमेरिकेमध्ये स्थापन झाली. जगातील आर्थिक व गुंतवणूक सल्लागार यांची जागतिक दर्जाची हि संघटना आहे. जगातील ७० देशातील ५०० विविध कंपन्यातील ६५ हजार पेक्षा जास्त सदस्य आहेत. आयुर्विमा व गुंतवणूक क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या जगातील मोजक्याच प्रतिनिधिनीची मिलियन डॉलर राउंड टेबल जागतिक परिषद घेतली जाते. या वर्षी हि परिषद अमेरिकेतील नाशिव्हिले टेनसी येथे दि. २५ जून ते २८ जून २०२३ या कालावधीत होत आहे. या परिषदेत विविध देशातील गुंतवणूक तज्ज्ञ मार्गर्दर्शन करणार आहेत. आमचे राज्य, देश तसेच विदेशातही ग्राहक आहेत. जगभरातील विमेदारांनी आमच्यवर दाखविलेल्या विश्वासामुळेच हे यश लाभले आहे.
ज्योती चव्हाण यांचे पती प्रा. शरद चव्हाण हे विमा सल्लागार आहेत. १ जानेवारी २००९ मध्ये कॅलेंडर वर्षाच्या पहिल्याच दिवशी ६४३ विमा पॉलिसी करून एका दिवशी भारतातील पहिली एम. डी. आर. टी. होण्याचा बहुमान मिळविला होता. त्यानंतर सौ. ज्योती शरद चव्हाण यांनी दि. १ जानेवारी २०२२-२३ या कॅलेन्डर वर्षात पहिल्याच दिवशी एका केसमध्ये एका दिवसात भारतातील पहिल्या एम. डी. आर. टी. होण्याचा बहुमान मिळविला आहे. भारतातील ५०० विविध कंपन्यांमधून प्रथम एम. डी. आर. टी. होण्याचा विक्रम त्याची केला आहे. ज्योती चव्हाण या एच. डी. एफ. सी. लाईफ या कंपनीत विमा गुंतवणूक सल्लागार आहेत. एच. डी. एफ. सी. लाईफच्या इतिहासात हि पहिलीच घटना आहे. भारतभरातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
पती प्रा. शरद चव्हाण यांची प्रेरणा घेऊन विमा क्षेत्रात काम सुरु केले. तर सासरे प्राचार्य पी. बी. चव्हाण, सासू विद्या चव्हाण व वडील प्राचार्य पी. एम. भोसले यांच्या यांचे प्रोत्साहन लाभल्याने मोठी स्वप्ने साकार करण्याचे बळ मिळाले आहे. प्राध्यापक बी. बी. चव्हाण, प्रविण वाघमारे, अभिनंदन पाटील, विपुल चौगुले, विशाल शिंदे या सर्वांचे सहकार्य तसेच एच. डी. एफ. सी. लाईफमधील सर्व स्टाफ यांचे मार्गदर्शन व सहकार्य यामुळे हे यश लाभले आहे,
असे ज्योती चव्हाण यांनी सांगितले.