प्रतिष्ठा न्यूज

सांगलीत नशेच्या २५० गोळ्या हस्तगत; दोघांना अटक; रॅकेट उघडकीस येण्याची शक्यता

प्रतिष्ठा न्यूज
सांगली प्रतिनिधी : स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा, सांगली यांच्या विशेष मोहिमेंतर्गत सांगली शहर पोलिस ठाणे हद्दीत नशेच्या गोळयांची अवैध विक्री करणारे ०२ इसमांना सापळा लावून अटक करण्यात आली असून त्यांच्याकडून २५० नग नशेच्या गोळ्या हस्तगत केल्या आहेत. पोलिस कॉन्स्टेबल विक्रम खोत यांनी फिर्याद दिली आहे. याप्रकरणी १) अनिकेत विजय कुकडे वय २१ वर्षे रा. गुजर बोळ, बुरुड गल्ली, सांगली, (२) उमर सलीम महात वय २० वर्षे रा. गवळी गल्ली सांगली. यांना अटक करण्यात आली आहे. नशेच्या गोळ्यांची अवैध विक्री करणारे रॅकेट उघडकीस येण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

गुन्ह्याची थोडक्यात हकीकत
दि.१०.०५.२०२३ रोजी मा. जिल्हाधिकारी सांगली व मा. पोलीस अधीक्षक सांगली यांचे अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालय, सांगली येथे पार पडलेल्या बैठकीमध्ये जिल्हयात होणा-या अवैध व बेकायदेशीर नशेच्या गोळया विक्रीवर प्रतिबंध करणे अनुषंगाने अन्न व औषध प्रशासन अधिकारी व कर्मचारी, केमिस्ट व ड्रगिस्ट असोसिएशन सांगली जिल्हा पोलीस अधिकारी व कर्मचारी यांना विशेष सुचना दिल्या होत्या.
त्याप्रमाणे पोलीस निरीक्षक सतिश शिंदे स्था.गु.अ. शाखा यांनी सहा. पोलीस निरीक्षक संदीप शिंदे व वरील अंमलदार यांचे पथकास वरिष्ठांच्या सुचनांप्रमाणे विशेष मोहिम राबवून अवैध व बेकायदेशीर नशेच्या गोळया विक्री
करणारे लोकांवर प्रभावी कारवाई करणेबाबत सुचना दिल्या होत्या.
सपोनि संदीप शिंदे व अंमलदार हे सांगली विभागात सांगली शहर पोलीस ठाणे हद्दीत पेट्रोलिंग
करीत अवैध व बेकादेशीर नशेच्या गोळ्या बाळगणारे, विक्री करणारे इसमांबाबत माहिती घेत असताना, पोकों/ विक्रम खोत व संतोष गळवे यांना त्यांचे खास बातमीदारामार्फत बातमी मिळाली की, रेकॉर्ड वरील गुन्हेगार अनिकेत कुकडे हा शिवमुद्रा चौक बुरुड गल्ली सांगली येथे नशेच्या गोळ्या विक्री करीता घेवुन येणार आहे. अशी खात्रीशीर गोपनीय माहिती प्राप्त झाली. मिळाले गोपनीय माहिती बाबत मा. पोलीस अधीक्षक सो सांगली यांचे परवानगीने नमुद पथकाने पंच, औषध निरीक्षक अधिकारी व्हि व्हि पाटील व स्टाफसह बुरुड गल्ली, कर्नाळ रोड जवळील शिवमुद्रा चौक येथे जावून छापा टाकला असता, सदर बातमीतील नमुद ठिकाणी ०२ इसम संशयीतरीत्या उभे असलेले दिसले त्यापैकी एकाचे हातात पिवळे रंगाची लहान कापडी पिशवी होती. सदर दोन इसमांमधील ०१ इसम हा रेकॉर्डवरील गुन्हेगार अनिकेत विजय कुकडे हाच असलेचे पोकों विक्रम खोत व संतोष गळवे यांनी ओळखले. मिळाले बातमीप्रमाणे खात्री झालेने सपोनि संदीप शिंदे व त्यांचे पथकाने नमुद पळून जाण्याचे तयारीत असलेले इसम नामे १) अनिकेत विजय कुकडे वय २१ वर्षे रा. गुजर बोळ, बुरुड गल्ली, सांगली २) उमर सलीम महात वय २० वर्षे रा. गवळी गल्ली सांगली यांना जागीच पकडले. अनिकेत विजय कुकडे याचे कब्जात असलेल्या पिशवीची झडती घेतली असता, त्यामध्ये ११३०/- रु. किंमतीच्या Nitravet- 10 NRx Nitrazepam Tablets IP10mg
(NITRAVET -10) गोळ्यांच्या १० स्ट्रिप ज्या प्रत्येक स्ट्रिपमध्ये १५ गोळया अशा १५० नग गोळया व ४४५/- रु. किंमतीच्या Nitrosun – 5 NRx Nitrazepam Tablets IP (Nitrosun R-5) गोळयांच्या १० स्ट्रिप गोळया ज्या प्रत्येक स्ट्रिपमध्ये १० गोळया अशा १०० नग गोळया अशा एकुण २५० नग नशेच्या गोळ्या च उमर महात यांचेकडे रोख रक्कम १२०० रु. असा एकूण २७७५/- रु. किंमतीचा मुद्देमाल मिळून आला आहे.
अनिकेत विजय कुकडे याचे कब्जात मिळून आलेला औषधी साठा हा ड्रग प्रकारात मोडतो व डॉक्टरांचे
सल्ल्याविना विनाकारण घेतल्यास तो मानवी जिवीतास व शरीरास अपायकारक आहे, सदर औषधांमुळे मानवी मेंदुवर गुंगिकारक परिणाम होतात असे औषध निरीक्षक व्हि व्हि पाटील यांनी सांगितले आहे. अनिकेत विजय कुकडे याचेकडे मिळून आलेल्या औषधी साठयाचे त्याचेकडे बील / परवाना / डॉक्टरांचे प्रिस्क्रीप्शन नसल्याची खात्री झाल्याने सपोनि संदीप शिंदे यांनी नमुद औषध साठा हा त्याने कशाकरीता बाळगला आहे. याबाबत विचारणा केली असता, त्याने सदरची औषधे ही नशा करणारे इसमांना जादा दराने विक्री करणेकरीता बाळगला आहे असे सांगितले. अनिकेत विजय कुकडे याने सदरचा औषध साठा कोठून आणला याबाबत त्यास विचारणा केली असता, त्याने सदरच्या गोळ्या शाहबाज शेख ऊर्फ जॅग्वार कर्नाळ रोड, सांगली याचेकडुन उमर सलीम महात यास चढ्यादराने नशेसाठी अवैध व बेकादेशीर विक्री करण्यासाठी आणल्या असलेचे सांगीतले आहे.
सदर रेडमध्ये जप्त करण्यात आलेला मुद्देमाल व आरोपी यांना पुढील कारवाई कामी सांगली शहर पोलीस ठाणे येथे जमा करण्यात आले आहे. गुन्ह्याचा पुढील तपास सांगली शहर पोलीस ठाणे करीत आहेत.
आरोपी नामे हा अनिकेत विजय कुकडे रेकॉर्डवरील आरोपी असुन त्याचेविरुद्ध यापुर्वी जबरी चोरी,
एनडीपीएस ॲक्ट व शरिराविरुद्ध गुन्हा अशा प्रकारचे गुन्हे दाखल आहेत. जिल्हयात नशेसाठी अवैध व बेकायदेशीर नशेच्या गोळ्या विक्री, व्यापार करणारे इसमांवर प्रभावी कारवाई करण्याची सदरची मोहिम चालु ठेवण्यात येणार आहे.
पोलीस अधीक्षक डॉ. बसवराज तेली, अपर पोलीस अधीक्षक तुषार पाटील (अतिरिक्त कार्यभार)
उपविभागीय पोलीस अधिकारी अजित टिके
पोलीस निरीक्षक सतीश शिंदे यांचे मार्गदर्शनाखाली
सहा. पोलीस निरीक्षक संदीप शिंदे, सहा. पोलीस निरीक्षक प्रशांत निशाणदार, सुधीर गोरे, बिरोबा नरळे, मच्छिंद्र बर्डे, संदीप पाटील, उदय माळी, अनिल कोळेकर, सागर लवटे, सागर टिंगरे,राहुल जाधव, संकेत मगदुम, अजय चेंदरे, गौतम कांबळे, संतोष गळवे, विक्रम खोत यांनी या कारवाईत सहभाग घेतला.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.