प्रतिष्ठा न्यूज

गगनबावडा तालुका दहावीचा निकाल ९७.९८ पाच शाळांचे निकाल शंभर टक्के

प्रतिष्ठा न्यूज /तुकाराम पडवळ
गगनबावडा : मार्च २०२३ मध्ये घेण्यात आलेल्या दहावी परीक्षेचा गगनबावडा तालुक्याचा निकाल ९७.९८ टक्के लागला.११ पैकी पाच शाळांचे निकाल शंभर टक्के लागले आहेत. तालुक्यातील एकूण ५४६ विद्यार्थी परीक्षेत बसलेले होते. त्यापैकी ५३५ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. त्यातील १६७ विद्यार्थी विशेष प्राविण्यासह उत्तीर्ण झालेले आहेत. शाळा निहाय निकाल असे :- माध्यमिक विद्यालय सांगशी १००टक्के, उदयसिंह पाटील माध्यमिक विद्यालय आसळज १००टक्के, श्री रामेश्वर हायस्कूल मंदुर  १००टक्के, श्री संत ज्ञानेश्वर माध्यमिक विद्यालय शेनवडे १००टक्के, शासकीय आश्रम शाळा बोरबेट १००टक्के, परशुराम विद्यालय गगनबावडा ९७.७७, माध्यमिक विद्यालय शेळोशी ९७.४०, यशवंत माध्यमिक विद्यालय असंडोली ९७.१०, श्रीराम हायस्कूल बावेली ९६.५५, मोहिते पाटील विद्यालय तिसंगी ९५.११, अनुसूचित अनुसूचित जाती व नव बौद्ध मुलांची निवासी शाळा गगनबावडा ९० टक्के.