प्रतिष्ठा न्यूज

आदर्श पब्लिक स्कूल (स्टेट बोर्ड) विटा मध्ये राजर्षी शाहू महाराज जयंती मोठ्या उत्साहात साजरी

प्रतिष्ठा न्यूज
सांगली प्रतिनिधी : राजर्षी शाहू महाराज जयंती आदर्श पब्लिक स्कूल स्टेट बोर्ड विटा च्या प्रांगणात शाळेचे मुख्याध्यापक तळेकर यांच्या हस्ते प्रतिमा पूजन करून कार्यक्रमाची सुरवात करण्यात आली. यावेळी शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
सदर कार्यक्रमाप्रसंगी विद्यार्थ्यांनी त्यांचे मनोगतं व्यक्त केली. तसेच सहशिक्षक राजेंद्र पाटील यांनी शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त त्यांचे सामाजिक व राजकीय कार्य याची माहिती सांगितली.