प्रतिष्ठा न्यूज

राजर्षी शाहू विद्यालय येथे माजी मुख्यमंत्री स्व.वसंतराव नाईक यांची जयंती आणि स्व.डाॅ.जे.जी.वाडेकर यांच्या पुण्यतिथी निमित्त वृक्षारोपण

प्रतिष्ठा न्युज/ राजू पवार 
 नांदेड : शहरातील राजर्षी शाहू विद्यालय व ज्युनिअर कॉलेजमध्ये माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांची जयंती आणि संस्थेचे संस्थापक अध्यक्ष स्वर्गीय डॉक्टर जे. जी.वाडेकर साहेब  यांची पुण्यतिथी  साजरी करण्यात आली. माजी मुख्यमंत्री स्व.नाईक आणि स्व.जे.जी.वाडेकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून स्मृतीस अभिवादन करण्यात आले.
       या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी  विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री बी.एम.हंगरगे हे होते.
           उपस्थित मान्यवर यांच्या हस्ते राज्याचे मुख्यमंत्री स्वर्गीय वसंतराव नाईक आणि डॉक्टर वाडेकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आला. तसेच यावेळी शाळेच्या  मैदानावर वृक्षारोपण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले .
      यावेळी  संस्थेचे संचालक मोहनराव पाटील सुगावकर, श्री चंद्रशेखर सोनवणे,प्रा.नामदेवराव अंभोरे,श्री गोपाळराव पाटील कदम, प्रा.जी. व्ही.थेटे सर, श्री    नरसिंगराव पावडे, तसेच संस्थेच्या मार्गदर्शिका, हितचिंतक   सुप्रसिद्ध स्त्रीरोग तज्ञ डॉ.गायत्री वाडेकर मॅडम, डॉ. शिवाजीराव वाडेकर,मु.अ.हंगरगे,डाॅ.तुकाराम जाधव, पर्यवेक्षक पंजाबराव सावंत, उप मुख्याध्यापक डॉ.पांडूरंग यमलवाड , श्री बालाजी कदम,आदी मान्यवर ,शिक्षक,शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी   उपस्थित होते. याप्रसंगी उपस्थित मान्यवर प्रमुख पाहुणे यांच्या हस्ते नारळाची 29 झाडे लावण्यात आली.
          शाळेत वृक्षारोपण करून माजी मुख्यमंत्री स्व.वसंतराव नाईक यांची जयंती आणि संस्थेचे संस्थापक अध्यक्ष स्व.डॉ.जनार्दन वाडेकर यांची पुण्यतिथी साजरी करण्यात आली.
मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.