सांगलीत ‘मेरा PIZZA मैं बनाऊंगा!’ उपक्रमासाठी मुलांची उत्सुकता शिगेला !

प्रतिष्ठा न्यूज/ योगेश रोकडे
सांगली : ३ ऑगस्ट २०२५ रोजी शाळेनंतरची शाळा भन्नाट शाळा “रॅपिडओब्रेन” आणि इव्हेंटोमेन्टो यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेला “बेक इट टू मेक इट, मेरा पिझ्झा मैं बनाऊंगा!” हा विशेष उपक्रम सांगलीतल्या मुलांसाठी एक संस्मरणीय अनुभव ठरणार आहे.
डॉमिनोज पिझ्झा , राम मंदिर कॉर्नर, सांगली येथे सकाळी ८ वाजता सुरू होणाऱ्या या कार्यक्रमात ६ ते १५ वयोगटातील मुले स्वतःचा Dream Pizza बनवण्याचा अनोखा अनुभव घेणार आहेत. तेही Domino’s च्या तज्ञ शेफ्ससोबत!
फक्त ₹१०४/- इतक्या नाममात्र शुल्कात मुलांना मजा, मस्ती आणि स्वादिष्ट पिझ्झाचा अनुभव मिळणार आहे. अशा उपक्रमांमुळे मुलांमध्ये सृजनशीलता, स्वयंपाकाची आवड आणि आत्मविश्वास वाढण्यास मदत होणार आहे.
कार्यक्रमाची नोंदणी वेगाने सुरू असून जागा मर्यादित आहेत. अधिक माहितीसाठी आणि सहभागासाठी खालील क्रमांकावर संपर्क साधावा: 9970160758 | 9175802480
मुलांमध्ये मजा, मस्ती आणि धम्माल भरलेला हा पिझ्झा डे नक्कीच संस्मरणीय ठरणार आहे!