पल्लवीने वडिलांच्या कष्टाचे फेडले पांग : दहावी मध्ये गगनबावडा तालुक्यात प्रथम
प्रतिष्ठा न्यूज /तुकाराम पडवळ
गगनबावडा : परशुराम विद्यालयाची विद्यार्थिनी कु. पल्लवी सुधीर नारकर हिने दहावी मध्ये ९४.८० टक्के मार्क्स मिळवून तालुक्यातून प्रथम येण्याचा मान मिळवला. व आपल्या जिद्दीचा प्रत्यय आणून दिला. यापूर्वी तिने आठवी स्कॉलरशिप परीक्षेत पहिला. दहावी विज्ञान प्रदर्शनात जिल्ह्यात दुसरा क्रमांक मिळवला आहे.
पल्लवी चे वडील मूळ कोकणातील फणस गावचे. व्यवसाय निमित्त ते गगनबावडायेथे गेली वीस वर्ष वास्तव्यास आहेत. ते कष्टाने व्यवसाय करत आहेत. पल्लवीने आपल्या यशाचे श्रेय आई-वडिलांना, प्राचार्य रंगराव गोसावी, गिरी बुवा सर, थोरात सर, पत्रावळे व कुंभार मॅडम यांना दिले आहे.