प्रतिष्ठा न्यूज

सिव्हिल हॉस्पिटलच्या समस्यांबाबत बुधवारी सांगली शहरातील जागृत नागरिक, सामाजिक, राजकीय कार्यकर्ते यांची बैठक

प्रतिष्ठा न्यूज
सांगली, ता. २० : सिव्हिल हॉस्पिटलच्या समस्यांबाबत बुधवारी (ता. २२) शहरातील जागृत नागरिक, सामाजिक, राजकीय कार्यकर्ते यांची बैठक होणार आहे. सकाळी साडेअकरा वाजता पंचमुखी रस्त्यावरील कष्टकऱ्यांची दौलत सभागृहात ही बैठक होणार असून, त्यामध्ये सिव्हिलच्या समस्या सोडवणुकीसाठी स्थानिक तसेच शासनस्तरावरील मागण्यांचा पाठपुरावा करण्यासाठीचा कृती कार्यक्रम ठरवण्यात येईल. सर्वांनी बैठकीस उपस्थित रहावे, असे आवाहन सर्वपक्षीय कृती समितीचे निमंत्रक सतीश साखळकर यांनी केले आहे.
गरीब-मध्यमवर्गीयांसाठीची ही आरोग्य व्यवस्था मजबूत व्हावी. त्यासाठी योग्य त्या स्तरावर स्थानिक प्रशासनाला सहकार्याची भूमिका कशी घेता येईल असा प्रयत्न आम्ही प्रारंभपासून केला आहे. शहरातील अनेक डॉक्टर्सनी यापूर्वी सिव्हिलमध्ये सेवा देऊन योगदान दिले आहे. हा बंध पुन्हा कायम करावा यादृष्टीनेही प्रयत्नांची गरज आहे. वैद्यकीय महाविद्यालयाच्या विकास समितीचे पुनरुज्जीवनासाठी काय करता येईल. यासाठी अधिष्ठांकडे पाठपुरावा करण्यात येईल. निवासी डॉक्टरांसाठी वसतीगृहापासूनच्या सर्व सुविधा, रुग्णांचे हक्क आणि इथे मिळू शकतील, अशा सुविधांविषयी मार्गदर्शन करणारा कायमस्वरुपी माहिती कक्ष सुरु करणे, नगरसेवकांचा रुग्णालयातील सुविधांवर वॉच राहण्यासाठी लोकमताचा रेटा वाढवणे, यासाठी जिल्ह्यातील सर्व आमदार, खासदार, लोकप्रतिनिधींनी एखादा अपवाद वगळता अलिकडच्या काळात कधीही सिव्हिलसाठी बैठक घेतल्याचे किंवा भेटी दिल्याचे दिसत नाही. चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांचे कंत्राटीकरण झाल्याने केवळ ठेकेदारांना पोसण्याचे उद्योग गेल्या अनेक वर्षांपासून सुरू आहेत.
हे सारे चित्र बदलायचे तर नागरिकांनाच लक्ष दिले पाहिजे. केवळ खासगी सुरक्षा कर्मचाऱ्यांच्या बळावर सिव्हिल सोडले आहे. ‘सिव्हिल’ वाचवले पाहिजे, मजबूत केले पाहिजे. ही जबाबदारी सर्व सांगली जिल्हा वासियांची आहे. त्यांचा यंत्रणेवर वचक निर्माण करणे, धर्मादाय कार्यालयाकडे नोंद असलेल्या सर्व खासगी हॉस्पिटल्समध्ये गरीबांना उपचार मिळवून देणे या हेतूने बैठकीत चर्चा होणार आहे. नागरिकांनी आपल्या सूचना लेखी स्वरुपातही द्याव्यात. रुग्णालयांशी दैनंदिन कनेक्ट ठेवण्यासाठी योगदान देऊ शकतील अशा स्वयंसेवक कार्यकर्त्यांची गरज आहे. गरीब रुग्ण व नातलगांसाठी सोयी सुविधा देण्यासाठी लोकांच्या मदतीची गरज आहे. नागरिकांच्या सूचनांचा विचारात घेत सिव्हिलप्रश्‍नी जनरेटा उभा केला जाईल, असे त्यांनी सांगितले.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.