प्रतिष्ठा न्यूज

तासगाव वीरशैव लिंगायत समाजाचे मंत्री शंभूराजे देसाईना निवेदन

प्रतिष्ठा न्यूज/किरण कुंभार 
तासगाव : मंगेश चिवटे हे गेल्या अनेक वर्षांपासून शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष व सध्या मुख्यमंत्री महोदय यांचे विशेष कार्यकारी अधिकारी, मुख्यमंत्री सहाय्यता मदत कक्ष अंतर्गत बराच काळ धडाडीचे काम करत आहेत.महाराष्ट्रातील लाखो रूग्णांना वैद्यकीय मदत कक्षाच्या माध्यमातून मदत करण्यात येत आहे. शिंदे साहेब व मंगेश चिवटे यांच्या मार्गदर्शनाखाली गेल्या अडीच वर्षांत सर्वाधिक निधी मुख्यमंत्री वैद्यकीय मदत कक्षाच्या माध्यमातून देण्यात आला आहे.ही सेवा प्रत्येक रूग्णापर्यंत पोहचवण्यासाठी मंगेश चिवटे यांची राज्यपाल नियुक्त कोट्यातून विधानपरिषदेवर नियुक्ती करावी.महाराष्ट्र राज्यात वीरशैव लिंगायत समाज बांधव मोठ्या संख्येने आहे.आतापर्यंत हा समाज राजकीय दुर्लक्षित राहिला आहे. समाजातील मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्ष प्रमुख म्हणून उल्लेखनीय काम करणारे मंगेश चिवटे यांना राज्यपाल नियुक्त कोट्यातून विधानपरिषदेत आमदार म्हणून संधी द्यावी,अशी मागणी तासगावातील वीरशैव लिंगायत समाजाच्यावतीने करण्यात आली आहे.तसे निवेदन उत्पादन शूल्कमंत्री शंभूराजे देसाई यांना देण्यात आले आहे.कॅबिनेट मंत्री शंभूराजे देसाई रथोत्सवानिमित्त तासगाव दौऱ्यावर आले होते.यावेळी त्यांची तासगावातील वीरशैव लिंगायत समाज बांधवांनी भेट घेऊन निवेदन दिले.यावेळी अविनाश शेटे,सौरभ हिंगमिरे,विनय शेटे,प्रसाद पैलवान, सुरेश पैलवान,महेश हिंगमिरे,मदन हिंगमिरे,जगदीश हिंगमिरे,प्रशांत शेटे, ज्योतिरादित्य शेटे,गजानन डोंबे, महादेव हिंगमिरे,अमोल शेटे, विनायक हिंगमिरे,रामशेठ शेटे,सचिन शेटे,निळकंठ टिंगरे,हेमंत हिंगमिरे, अमित कराडे,यांच्यासह इतर समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.