प्रतिष्ठा न्यूज

तासगावातील सार्थ प्रशांत पाटीलची नीट परीक्षेत नेत्रदीपक कामगिरी.. लातूर जिल्ह्यात प्रथम येण्याचा बहुमान…

प्रतिष्ठा न्यूज/किरण कुंभार 
तासगाव : नॅशनल टेस्टीन एजन्सी भारत सरकार यांच्यावतीने २०२४ मध्ये घेण्यात आलेल्या नीट परीक्षेत तासगांवातील सार्थ प्रशांत पाटील याने ७१० गुण मिळवून लातूर जिल्हयात प्रथम येण्याचा बहुमान मिळवला आहे.त्याच्या या नेत्रदिपक यशाबद्दल तासगांवसह परिसरातून त्याचे कौतुक होत आहे.सार्थ याचे दहावी पर्यंतचे शिक्षण सांगली येथील सॅन्थोम स्कूल येथे झाले.येथे बोर्ड परीक्षेत स्कूलमध्ये प्रथम क्रमांकाचा बहुमान मिळवला.नंतर १२ वी पर्यंतचे शिक्षण नावलौकिक असलेले लातूर येथील छत्रपती शाहू महाविदयालय येथे झाले.तसेच सीबीएसई बोर्ड परीक्षेत एकूण ९७ टक्के गुण मिळवले.तर जेईई
परीक्षेत त्याने ९९.२० टक्के गुण मिळवले.वैदयकिय क्षेत्रात कौटुंबिक वारसा असल्याने व वैदयकिय क्षेत्राची आवड असल्याने सार्थने नीट परीक्षा देण्याचा निर्णय घेतला.त्याचे शिक्षण लातूर येथील नावलौकिक असलेले छत्रपती शाहू महाविदयालय येथून घेतले.तसेच श्री चिया आराधना अॅकॅडमी व अॅलेन अॅकॅडमी येथे ही यासाठीचा सराव त्याने केला.येथे ही त्यास चांगले मार्गदर्शन लाभले.या यशानंतर त्यास एआयआयएमएस,भोपाळ या ठिकाणी एम.बी.बी.एस.साठी प्रवेश मिळाला आहे.
सार्थचा पाच लाखाचे बक्षीस देऊन सन्मान.सार्थ तासगांवातील प्राजक्ता हॉस्पिटलचे प्रसिध्द स्त्रीरोग तज्ञ डॉ. प्रशांत पाटील व डॉ.शितल पाटील यांचा चिरंजीव आहे.त्याच्या यशाबद्दल विट्यातील आराधना अॅकॅडमीने बक्षीस म्हणून पाच लाख रूपयांचा धनादेश देऊन सार्थचा सन्मान केला आहे.तसेच शाहू महाविद्यालय,अॅलेन अॅकॅडमी यांनी त्याचा बक्षीस देऊन सन्मान केला आहे.तासगांव परिसरातून ही वैदयकिय क्षेत्रासह विविध क्षेत्रातील मान्यवरांनी भेट घेऊन सार्थचे अभिनंदन केले आहे.
ध्येय,जिद्द,चिकाटी यामुळे यश-सार्थ पाटील..शैक्षणिक क्षेत्रात सर्वच टप्पे पार करताना सार्थने नेत्रदिपक अशीच कामगिरी केली आहे.तर वैदयकिय क्षेत्रातील कौटुंबिक वारसा असल्याने सार्थला ही वैदयकिय क्षेत्राची आवड निर्माण झाली. यासाठी नीट परीक्षा दयायची असा निर्णय घेतला व ध्येय डोळयासमोर जिद्द,चिकाटी अंगिकारून पाऊल टाकले यामुळे हे यश मिळाले असे मत सार्थ पाटील ने व्यक्त केले.
मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.