प्रतिष्ठा न्यूज
राजकीय

मोदींच्या विकसित भारतासाठी सांगलीतून संजयकाकाच विक्रमी मतांनी जिंकणार : महंत योगी आदित्यनाथ; महाविजय संकल्प सभा ; प्रचंड जल्लोष आणि लाखोंचा जनसागर

प्रतिष्ठा न्यूज
सांगली प्रतिनिधी : सन्मान सुरक्षा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विकसित भारतासाठी सांगलीतून खासदार संजयकाका पाटील विक्रमी मताधिक्याने जिंकणार आहेत, असा विश्वास उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री महंत योगी आदित्यनाथ यांनी व्यक्त केला.
सांगली लोकसभा मतदारसंघातील भाजपा महायुतीचे उमेदवार खासदार संजयकाका पाटील यांच्या प्रचारार्थ येथील चिंतामणराव वाणिज्य महाविद्यालयाच्या प्रांगणात झालेल्या महाविजय संकल्प सभेत ते बोलत होते. या सभेला मतदारसंघातील लाखो लोकांनी गर्दी केली होती. जमलेल्या जनसागरातून जल्लोषपूर्ण घोषणाबाजी सुरू होती. या सभेमुळे संजयकाकांच्या विजयावर शिक्कामोर्तब झाले असल्याची चर्चा उपस्थितांमध्ये होती.
योगी आदित्यनाथ यांनी सभेच्या सुरुवातीलाच भारत माता की जय! गणपती महाराज की जय! छत्रपती शिवाजी महाराज की जय! अशा घोषणा देऊन उपस्थित जनसागराचे मन जिंकले. महाराष्ट्राची भूमी ही पराक्रमी पावन आणि सांस्कृतिक परंपरेची आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली. जननायक कसा असला पाहिजे हे छत्रपतींनी दाखवून दिले आहे त्यांच्या भूमीला वंदन करण्यासाठी मी येथे आलो आहे. अशी सुरुवात करून टिळक, शाहू, बाजीराव पेशवे, सावरकर, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अशा महाराष्ट्रातील महापुरुषांचे नावे घेत त्यांनी सभेचा ताबा घेतला. प्रचंड जल्लोषपूर्ण अशा वातावरणात त्यांच्या भाषणाला सुरुवात झाली एक भारत श्रेष्ठ भारत ही मोदीजींची संकल्पना अस्तित्वात आणण्यासाठी आपण सर्वजण जमलो आहोत. २०१४ पूर्वीचा भारत आणि नंतरचा भारत असा इतिहास लिहिला जाईल. पूर्वी आतंकवाद आणि नक्षलवादाने देश पोखरला होता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आतंकवाद संपवला आहे आणि देश सुरक्षित केला आहे. आता कुठे साधा फटाका जरी फुटला तरी पाकिस्तान आमचा त्या सहभाग नाही असे स्वतःहून सांगतो. पूर्वी मात्र पाकिस्तानच आतंकवादी हल्ले घडवून आणत होता. परंतु आता भारत कोणाची स्वतःहून छेड काढत नाही आणि कोणी छेड काढण्याचा प्रयत्न केला तर त्यांना सोडत नाही. छेडता नहीं छोडता नाहीं! अशी प्रतिमा मोदींनी देशाची तयार केली आहे. शेतकऱ्यांसाठी विविध योजना राबवून शेतकऱ्यांना सक्षम केले आहे. तरुणांना पीएम स्टार्टअप, स्टँड अप, मुद्रा अशा विविध योजनांच्या माध्यमातून उद्योग क्षेत्रात उभा राहण्याचे बळ दिले आहे. महिलांचे सक्षमीकरण केले आहे‌. यापुढे तीन कोटी लखपती दीदी करण्याचा संकल्प आहे.
*इटलीला राहायचे तर भारतात निवडणुका लढता कशाला?*
देश संकटात असताना देशाचा पंतप्रधान कशाप्रकारे त्याला सामोरे जातो आणि देश सांभाळतो हे नरेंद्र मोदी यांनी दाखवून दिले. परंतु राहुल गांधी मात्र कोरोना आला तेव्हा इटलीला पळून गेला होता. इटलीला जाऊन राहायचे असेल तर भारतामध्ये निवडणुका लढता कशाला? असा सवाल योगी यांनी विचारला. बाहेरच्या देशात जाऊन देशाला नाव ठेवायची आणि इथे आल्यावर एक वेगळ्या प्रकारचा भारत घडवण्याची स्वप्न जनतेला दाखवायची तसं राहुल गांधींचे कारस्थान आहे.
परंतु मोदींनी गेल्या दहा वर्षात कोट्यावधी लोकांच्या आयुष्यात परिवर्तन घडवून आणले आहे आयुष्यमान भारत, जनधन योजना अशा अनेक योजना राबवल्या आहेत. कोणतीही योजना राबवताना मोदीजींनी जात धर्म समाज पाहिलेली नाही‌. सबका साथ सबका विकास हीच त्यांची घोषणा आहे. हेच त्यांचे ध्येय आहे.
दहा वर्षात 150 विमानतळ, पूर्वीपेक्षा दुप्पट महामार्गाचे जाळं निर्माण केले आहे. गरिबांच्या कल्याणासाठी अनेक योजना राबवलेल्या आहेत.
योगी पुढे म्हणाले, नवीन भारताचा सन्मान, विकास आणि गरिबांचे कल्याण हीच आमची काम करण्याची दिशा आहे. भारताचा सन्मान आणि अस्मिता जपण्यासाठी आम्ही नेहमीच आग्रही आहोत. गेल्या 65 वर्षात काँग्रेसवाले राम मंदिर बांधू शकले नाहीत. ज्यावेळी न्यायालयाचा निकाल येईल तेव्हा रक्ताचे पहाट वाहतील असे काँग्रेसवाले म्हणत होते परंतु राम मंदिराच्या बाबतीत न्यायालयाचा निकाल आल्यानंतर साधा डोसा ही मेला नाही. आज तुम्ही आयोध्येला जाऊन पहा रामायण काळातील आयोध्या पुन्हा तुम्हाला पाहायला मिळेल. प्रभू रामचंद्रांची मंदिरात प्राणप्रतिष्ठा करून आपल्या देशाची अस्मिता आम्ही जपलेली आहे. अयोध्येला एकाच दिवशी पाच लाख लोक आले तरी त्यांना रामलल्ला चे दर्शन होऊ शकेल इतकं भव्य मंदिर बांधण्यात आलेलं आहे. राम मंदिराच्या चळवळीमध्ये महाराष्ट्राचे योगदान मोठं आहे.
*ओबीसी आरक्षणाचा हिस्सा मुसलमानांना देण्याचा काँग्रेसचा डाव*
योगी म्हणाले, ओबीसी आरक्षणातील सहा टक्के वाटा मुसलमानांना देण्याचा काँग्रेसचा डाव आहे. परंतु आम्ही हे होऊ देणार नाही. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी सांगितलं होतं की धार्मिक आधारावर कोणालाही आरक्षण मिळणार नाही. त्यामुळे संविधानाचा अपमान होईल असं कृत्य आम्ही कधीही करणार नाही.
*काँग्रेसचा जाहीरनामा मुस्लिम धार्जिणा*
काँग्रेसने जो जाहीरनामा प्रसिद्ध केला आहे त्यामध्ये अल्पसंख्यांकांना त्यांच्या आवडीचे खाण्यापिण्याचे स्वातंत्र्य देण्यात येईल असे म्हटले आहे. अर्थात गोमांस खाण्याची मुभा ते देणार आहेत. आपल्याला ते चालणार नाही. गो हत्येला खुली सूट देण्याचं काँग्रेसचा धोरण आहे. आपण ते सहन करणार नाही. त्यामुळे काँग्रेसचे धोरण हे मुस्लिम धार्जिणं आहे. असे योगी म्हणाले.
*आग्रा येथे छत्रपती शिवाजी महाराज म्युझियम*
योगी म्हणाले, उत्तर प्रदेश मध्ये जेव्हा काँग्रेसचे सरकार होते तेव्हा त्यांनी मुघल म्युझियम उभारण्याचा घाट घातला होता. तेव्हा आम्ही त्याला विरोध केला. गुलामीची प्रतीक आम्ही नष्ट करणार आहोत असे सांगितले‌ या देशाच्या अस्मितेला ठेच लागेल असं काहीच आम्ही ठेवणार नाही. ज्यांनी हिंदवी स्वराज्य स्थापन केले त्या छत्रपतींच्या नावाने सध्या आग्रा येथे छत्रपती शिवाजी महाराज म्युझियम उभारण्याचे काम सुरू आहे. ते लवकरच पूर्ण होईल.
*काँग्रेसचे धोरण फोडा आणि राज्य करा*
या लोकसभेच्या निवडणुकीनंतर काँग्रेस इतिहास जमा होणार आहे. काँग्रेसचं राम नाम सत्य होणार आहे. त्यामुळे खोटं बोलून काहीही करून सत्ता मिळवण्यासाठी त्यांचा प्रयत्न सुरू आहे. त्यासाठी ते
जातीजातीत भांडण लावून सत्ता भोगण्याचे मनसुबे रचत आहेत. हेच काँग्रेसचे षडयंत्र आहे. याला आपण बळी पडू नये. जातीय जनगणना करणे, संपत्तीची वाटणी करून ती अल्पसंख्याकांना देणे. आपापसात भांडण लावणे हे अतिशय घातक आहे. फोडा आणि राज्य करा हे त्यांचे धोरण आहे.

*सांगलीकरांना अयोध्या भेटीचं निमंत्रण*
योग्य आदित्यनाथ राम मंदिरा वरती बोलता बोलता म्हणाले की संजयकाका आपण या सर्व लोकांना घेऊन दर्शनासाठी अयोध्याला या! आपल्या सगळ्यांची व्यवस्था केली जाईल. यावरती जय श्रीराम अशा घोषणांनी आसमंत दुमदुमून गेला.
*विक्रमी मताने जिंकणार*
छत्रपती शिवाजी महाराजांच्या संकल्पनेतील राष्ट्र घडविण्यासाठी सन्मान सुरक्षा आणि विकसित भारत ही मोदीजींची संकल्पना अस्तित्वात आणण्यासाठी हिंदू राष्ट्र अर्थात रामराज्य आणण्यासाठी मोदींचे प्रतिनिधी असणारे खासदार संजयकाका पाटील हे सांगलीतून विजयी होणे आवश्यक आहे. आणि ते
विक्रमी मतांनी निवडून येतील असा विश्वास योगी आदित्यनाथ यांनी व्यक्त केला.

खासदार संजयकाका पाटील यांनी बोलताना, महाविकास आघाडीचे उमेदवार पैलवान चंद्रहार पाटील आणि काँग्रेसचे बंडखोर अपक्ष उमेदवार विशाल पाटील यांच्यावर टीका केली.
यावेळी भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, पालकमंत्री सुरेश खाडे, आमदार सुधीर गाडगीळ, आमदार गोपीचंद पडळकर, भाजपा पश्चिम महाराष्ट्र समन्वयक शेखर इनामदार, मकरंद देशपांडे, ज्येष्ठ नेते दीपकबाबा शिंदे, म्हैसाळकर, पृथ्वीराज देशमुख नितीन शिंदे, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हाध्यक्ष तानाजी सावंत, जनस्वराज्य शक्ती पार्टीचे प्रदेशाध्यक्ष समित कदम, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख महेंद्र चंडाळे, माजी जिल्हा परिषद सदस्य तमनगोंडा रवी पाटील, राष्ट्रवादीचे शहर जिल्हाध्यक्ष प्राध्यापक पद्माकर जगदाळे यांच्या महा युतीचे घटक पक्षांचे पदाधिकारी मंचकावर उपस्थित होते.
या सभेसाठी जिल्ह्यातून प्रचंड गर्दी झाली होती. संजय काका हक्काचा पुन्हा खासदार सांगलीचा या गीतावर अनेकांनी ठेका धरला होता.

@pratishthanews

#sanjaykaka

Sangli

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.