प्रतिष्ठा न्यूज

वसंतदादाच्या पद्माळेत एकच नारा, संजयकाकांची हॅटट्रिक करा; पुष्पवृष्टी व फटाक्यांच्या आतषबाजीत संजयकाकांचे जल्लोषात स्वागत; विशाल पाटील गावातच बेदखल

प्रतिष्ठा न्यूज
सांगली प्रतिनिधी : सांगली लोकसभा मतदारसंघातील भारतीय जनता पार्टी महायुतीचे उमेदवार खासदार संजयकाका पाटील शुक्रवारी वसंतदादाच्या पद्माळे या गावी गेले होते. पद्माळकरांचा एकच नारा संजयकाकांची हॅटट्रिक करा! अशा वातावरणात पुष्पवृष्टी व फटाक्यांच्या आतषबाजीत संजयकाकांचे जल्लोषात स्वागत करण्यात आले. त्यामुळे विशाल पाटील यांना त्यांच्या गावानेच बेदखल केल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.
संजयकाका पाटील यांनी शुक्रवारी सांगली विधानसभा मतदारसंघातील ग्रामीण भागात प्रचार दौरा केला. दरम्यान वसंतदादा पाटील यांच्या गावी पद्माळे येथे जाताच नागरिकांनी फटाक्यांची आतषबाजी केली. माता भगिनींनी पुष्पवृष्टी करत औक्षण केले. जणूकाही साक्षात वसंतदादा पाटील यांनीच गावाला संजयकाकांना विजयी करण्याचे आदेश दिले आहेत की काय असेच चित्र दिसत होते. नागरिकांनी भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून खासदार संजयकाका पाटील यांनी केलेल्या विकासकामांची प्रसंशा केली. जो आमच्या सुख दुःखात येतो तोच आमचा नेता. संजयकाका पाटील हेच भागाचा विकास करू शकतात असा विश्वास व्यक्त केला.
वसंतदादाच्या वारसांनी दादांच्या विकासाचा वारसा न चालवता संस्था मोडून खाण्याची आणि लोकांना फाट्यावर मारणारी स्वार्थी वृत्तीचे आणि फक्त अडचणीच्या वेळी गावाचं नाव घेणाऱ्या नेत्यांना आम्ही आता धडा शिकविणार आहोत. अशा प्रतिक्रिया नागरिकांनी व्यक्त केल्या. एकंदरीत स्वतःच्या पद्माळे गावातच अपक्ष उमेदवार विशाल पाटील बेदखल झाल्याचे चित्र दिसत आहे.
संजयकाका पाटील म्हणाले, वैचारिक परंपरा असलेल्या पद्माळे गावाने दिलेले प्रेम आणि स्वागत ही माझ्या मोठ्या विजयाची नांदी आहे. आपण सांगाल ते काम केले जाईल. विकास कामे हाच भारतीय जनता पार्टीचा अजेंडा आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशाने प्रगती केली आहे. देव महासत्ता होण्याच्या मार्गावर आहे. त्यामुळे जास्तीत जास्त मते देऊन विजयी करा. असे आवाहन संजयकाका पाटील यांनी केले.

Related Articles

Back to top button
Don`t copy text!