प्रतिष्ठा न्यूज

आम्ही काय केले हे विचारणारांनी गावोगावी जाऊन केलेली विकासकामे पाहावीत : संजयकाका पाटील; मिरज ग्रामीण भागात दौरा

प्रतिष्ठा न्यूज
सांगली प्रतिनिधी : जनतेसाठी आम्ही काय केले असे विचारणाऱ्या विरोधकांनी जिल्ह्यातील गावागावात जाऊन केलेली विकासकामे पाहावीत, असे आवाहन सांगली लोकसभा मतदार संघातील भारतीय जनता पार्टीचे उमेदवार खासदार संजयकाका पाटील यांनी केले.
मिरज ग्रामीण भागातील वड्डी, म्हैसाळ, विजयनगर , नरवाड, बेडग, राग,लिंगनूर आणि खटाव या गावात प्रचार दौऱ्या दरम्यान आरग येथील प्रचार सभेत ते बोलत होते.
पालकमंत्री सुरेश खाडे, भाजपा मिरज विधानसभा क्षेत्र निवडणूक प्रमुख काकासाहेब धामणे, सुशांत खाडे, आरगचे सरपंच डॉ. अनिल कोरबु, बेडग सरपंच उमेश पाटील, वड्डी सरपंच महेंद्रसिगं शिंदे, विजयनगर सरपंच नंदकुमार कोरे, नरवाड सरपंच मारूती जमादार, लिंगनूर सरपंच पिंटू पाटील, खटाव सरपंच रावसाहेब बेडगे, ज्येष्ठ नेते अभिनंदन सलगरे, भाजपा युवा मोर्चा जिल्हा सरचिटणीस मयुर नाईकवाडे, उमेश हारगे यांच्या सह भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते या दौऱ्यात सहभागी झाले होते.
संजयकाका पाटील म्हणाले, विरोधक आम्हाला आम्ही केले असे प्रश्न विचारत आहेत. निवडणूक आल्यावरच जे मतदार संघात जातात त्यांना आम्ही केलेली विकासकामे काय दिसणार? त्यांच्या ३५ वर्षातील काळातील निधीपेक्षा आम्ही गुणिले निधी आणला आहे. मतदार संघातील बहुतेक प्रश्न आम्ही सोडवले आहेत. विरोधकांनी डोळे उघडून त्यांनी पाहावे म्हणजे त्यांना जिल्ह्यात झालेला बदल दिसेल. लोक हुशार आहेत त्यांना विरोधक काय आहेत ते माहीत आहे. प्रचंड विकासाची कामे आम्ही केली. पाणी, रस्ते महामार्ग, विविध योजना पूर्णत्वास नेल्या आहेत. येणारा काळ सुवर्णकाळ असणार आहे. मिरज तालुक्यातील जनता निश्चितपणे भाजपाला, मोदींनी आणि मला साथ देणार आहे. असा विश्वास संजयकाका पाटील यांनी व्यक्त केला.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.