प्रतिष्ठा न्यूज

प्रकाशबापूंचे सहकारी विशाल दादांच्या प्रचारात; शैलजाभाभी पाटील यांनी घेतले जुन्या कार्यकर्त्यांची भेट

प्रतिष्ठा न्यूज
सांगली : सांगली लोकसभा मतदारसंघातील अपक्ष उमेदवार विशाल दादा पाटील यांच्या प्रचारात श्रीमती शैलजा भाभी पाटील यांनी दिवंगत प्रकाशबापू पाटील यांच्या जुन्या सहकाऱ्यांची भेट घेतली. या सहकाऱ्यांनी विशाल दादा पाटील निवडून येणार असल्याचे खात्री दिली.
श्रीमती शैलजाभाभी पाटील यांनी मिरज शहरातील प्रकाशबापू पाटील यांचे जुने सहकारी व मित्र परिवारांच्या भेटीगाठी घेतल्या. यावेळी जुन्या कार्यकर्त्यांनी प्रकाश बापूंनी केलेल्या कामांच्या आठवणीना उजाळा दिला. प्रकाश बापू पाटील यांनी गोरगरीब जनतेसाठी नेहमीच विकासाची दारे खुली केल्याचे सांगितले. तर भारतनगर येथील कार्यकर्त्यांनी विशाल दादांच्या विजयासाठी अहोरात्र प्रयत्न सुरू असल्याचे सांगितले.
यावेळी मिरजेचे माजी महापौर विजय धुळूबुळू, ज्येष्ठ नेते कल्लाप्पांना लठ्ठे, पी. एल. राजपूत,  दयाधन सोनवणे, माजी उपमहापौर डॉक्टर राजेंद्र मेथे, अशोक राजपूत, प्रकाश पवार, डी. पी. बनसोडे, भास्करराव पाटील, चंद्रकांत मोरे, माजी नगरसेवक जुबेर चौधरी, शंकर कोळेकर उपस्थित होते.
मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.