प्रतिष्ठा न्यूज
राजकीय

मतदारांना स्वाभिमानाने मतदान करण्याची बुद्धी द्या : महेश खराडे यांचे शिवतीर्थावर साकडे ; प्रचार सांगता

प्रतिष्ठा न्यूज
सांगली / प्रतिनिधी : सांगली लोकसभेचे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अधिकृत उमेदवार महेश खराडे यांच्या प्रचाराची सांगता रविवारी सायंकाळी झाली. छत्रपती शिवाजी महाराजांना साकडे घालून अनोख्या पद्धतीने ही सांगता झाली.
लुटारू साखर सम्राटांपुढे लाचार होणाऱ्या मतदार राजाला स्वाभिमानाने मतदान करण्याची वृत्ती अंगी बाणवा. असे साकडे घालून ही सांगता झाल्याचे उमेदवार महेश खराडे यांनी सांगितले. खराडे म्हणाले पहाटे चार वाजता शहरातील वृत्तपत्र विक्रेत्यांच्या भेटीगाठी घेतल्या. त्यानंतर कृष्णा नदीवर पोहण्यासाठी येणाऱ्या सर्वाना शिट्टी ला मतदान करण्याचे आवाहन केले. बापट मळा व आमराई येथील वॉकर ग्रुप सदस्यांच्या भेटी घेतल्या. सकाळी अकरा वाजता गणपतीचे दर्शन घेऊन गणपती पेठ, कापडपेठ, टिळक चौकातून हरभट रोड मार्गे मारुती चौकातून पदयात्रा काढण्यात आली. सर्व व्यवसायकीच्या भेटी घेऊन छत्रपती शिवाजी महाराज यांच्या आश्वारूढ पुतळ्यास पुस्पहार घालून अभिवादन घालून साकडे घालण्यात आले. या वेळी खराडे म्हणाले सांगली जिल्ह्यातील बहुतांश मतदार लाचार आणि गुलाम झाला आहे. स्वाभिमान गहाण टाकला आहे. शेतकऱ्यांना लुटणाऱ्या साखर सम्राटच्या आहारी गेला आहे त्यामुळे गुलाम झालेल्या मतदारांना स्वाभिमानाने मतदान करण्यास शिकवा , असे साकडे आम्ही घालून प्रचाराची सांगता केली.
यावेळी अजित हळींगळे, डॉ. जयपाल चौगुले, लक्ष्मण यादव, सुरेश पश्चिबरें, आम्रपाली कदम, आदिसह अन्य उपस्थित होते.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.