प्रतिष्ठा न्यूज

संस्कार भारती सांगली समिती तर्फे भारतमाता पूजन कार्यक्रम संपन्न

प्रतिष्ठा न्यूज
सांगली प्रतिनिधी दि 29 : लो. टिळक स्मारक मंदिर, सांगली येथे संस्कार भारती सांगली समिती तर्फे भारतमाता पूजन कार्यक्रम संपन्न झाला.श्री.विवेक गाडगीळ यांनी प्रथम संस्कार भारती गीत सादर केले.या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून मा.ईश्वर रायण्णवर हे लाभले होते.पाहुण्यांच्या हस्ते भारतमाता प्रतिमेचे पूजन करण्यात आले.श्री.हर्षल वैद्य यांनी वैयक्तिक देशभक्तीपर गीत सादर केले. अध्यक्ष श्री.वैशंपायन यांनी प्रास्ताविक केल्यानंतर सचीव सौ.कविता कुलकर्णी यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला.प्रमुख पाहुणे श्री. रायण्णवर यांनी आपल्या ओघवत्या भाषेमध्ये अनाम क्रांतिकारकांच्या शौर्यगाथा कथन करून देशप्रेमाची भावना जागृत केली व अज्ञात इतिहासाची पाने उलगडली.याशिवाय सांगली शिक्षण संस्थेच्या सिटी हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी राणी लक्ष्मीबाई व तात्या टोपे
यांच्या जीवनावर आधारित एक नाटिका सादर केली. श्री .हेरंब साठे यांनी संस्कृतमध्ये लेखन केलेल्या या नाटिकेचे दिग्दर्शन सौ.अश्विनी खाडीलकर यांनी केले होते.राणी लक्ष्मीबाईंच्या भूमिकेत कु.भार्गवी सप्रे आणि तात्या टोपे यांच्या भूमिकेत अथर्व पोवळे यांनी दमदार अभिनय आणि उत्तम संवादफेक करून प्रेक्षकांची मने जिंकून घेतली.
या कार्यक्रमास संस्थेचे अध्यक्ष श्री.माधव वैशंपायन,सचीव सौ.कविता कुलकर्णी,कार्यक्रम प्रमुख श्री.विवेक गाडगीळ,संतोष बापट,भालचंद्र चितळे,सुहास पंडित,अन्य सभासद व नागरिक उपस्थित होते.
तसेच संस्कार भारती पश्चिम प्रांत विभागाचे प्रतिनिधी म्हणून श्री.अमित मराठे व मिलिंद महाबळ यांनी प्रतिनिधीत्व केले.सौ.वैशाली हुन्नुर यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले . कार्यक्रम प्रमुख श्री.विवेक गाडगीळ यांनी आभार प्रदर्शन केले व कार्यक्रम संपन्न झाला.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.