बालमहोत्सव उत्साहात संपन्न
प्रतिष्ठा न्यूज
सांगली, दि. 2, (प्रतिनिधी) : जिल्ह्यातील काळजी आणि संरक्षणाची बालगृहातील मुले आणि इतर मुलांच्या बाल महोत्सवाचे उद्घाटन 31 डिसेंबर रोजी करण्यात आले होते. हा बाल महोत्सव उत्साहात संपन्न झाला. या बाल महोत्सवाचे पारितोषिक वितरण महानगरपालिका उपायुक्त स्मृती पाटील यांच्याहस्ते करण्यात आले. यावेळी बाल कल्याण समिती अध्यक्ष निवेदिता ढाकणे, सदस्य जयश्री पाटील, कालदिास पाटील आदि मान्यवर उपस्थित होते. यावेळी श्रीमती स्मृती पाटील यांनी सर्व मुलांना व मुलींना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी सुवर्णा पवार, शासकीय मुलींचे बालगृह मिरज चे अधिक्षक डी. एस. तिरमके, दिपीका बोराडे, संजय चौगुले, बाबासाहेब नागरगोजे, मिलींद कुलकर्णी, व इतर संस्था अधिक्षक व अधिकारी व कर्मचारी, जिल्हा बाल संरक्षण कक्ष सांगली या सर्वांनी बालकांसमवेत भाग घेवून बाल महोत्सव उत्साहात पार पाडला.
बाल महोत्सवामध्ये मुला / मुलींच्या व्यक्तीमत्व विकासास चालना देण्यासाठी सांघिक खेळ व वैयक्तीक क्रीडा प्रकारांच्या स्पर्धा जिल्हास्तरावर बाल मेळाव्याच्या माध्यमातून घेण्यात येत आहेत. यामध्ये कबड्डी, खो-खो, क्रिकेट, व्हॉलीबॉल, रिले 4X100 मीटर इत्यादी तसेच वैयक्तीक खेळामध्ये 100 व 200 मीटर धावणे, बुध्दीबळ इत्यादी खेळांचा समावेश करण्यात आला आहे. याचबरोबर मुलांच्या व्यक्तीगत कलागुणांना वाव देण्यासाठी चित्रकला, निबंधस्पर्धा, शुघ्दलेखन, हस्ताक्षर, समुहगीत तसेच सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले. सन 2022-23 मधील मुलींच्या गटामध्ये भगिनी निवेदिता प्रतिष्ठान संचलित मुलींचे बालगृह जत यांनी मुलींची जनरल चॅम्पीयनशीप तर मुलांच्या गटामध्ये जिल्हा परिविक्षा आणि अनुरक्षण संघटना संचलित कै. दादूकाका भिडे मुलांचे बालगृह/निरीक्षणगृह सांगली यांनी मुलांची जनरल चॅम्पीयनशीप पटकवली.