प्रतिष्ठा न्यूज

सावळज ग्रामपंचायतीची मासिक मिटींग/ ग्रामविकास अधिकाऱ्याविना विरोधी भाजप सदस्य व संतप्त नागरिकांनी ग्रामसेवकाला मिटिंग मधून हाकलले

प्रतिष्ठा न्यूज / अनिल शिंदे
सावळज : सावळज ता. तासगाव येथील ग्रामपंचायतीची मासिक मिटिंग सरपंच मीनल पाटील यांनी बोलवलेली होती या मासिक मीटिंगच्या वेळी ग्रामविकास अधिकारी देसाई एल. व्ही. यांच्या गैरकारभाराबाबत आक्षेप घेत विरोधी भाजप सदस्यांनी व संतप्त नागरिकांनी ग्रामविकास अधिकाऱ्याला धारेवर धरत मासिक मिटींगला बसून न देता ग्रामपंचायतीच्या बाहेर हाकलले. त्यामुळे ग्रामपंचायतची मासिक मीटिंग ग्रामविकास अधिकाऱ्याविना पार पडली. या घडामोडीमुळे सावळज मधील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे.

सावळज ग्रामपंचायतची ग्रामसभा दि. 20 सप्टेंबर रोजी पार पडली होती.त्या ग्रामसभेमध्ये आशा स्वयंसेविका निवडीबद्दल निर्णय घेण्यात आले होते. त्या ग्रामसभेमध्ये झालेल्या चर्चेनुसार आशा स्वयंसेविका निवडलेले नाहीत व ती ग्रामसभा बोगस असून ग्रामविकास अधिकारी यांनी प्रोसिडिंग बदललेले आहे, असा आक्षेप विरोधी भाजपच्या दोन सदस्यांनी घेतला होता. यासंबंधीची तक्रार त्यांनी गटविकास अधिकारी मोहितेसो यांच्याकडे लेखी स्वरूपात दि.12 डिसेंबर रोजी दिलेली होती. त्या तक्रारीवर अद्याप निर्णय झाला नसल्याने ग्रामसेवक देसाई यांना मासिक मीटिंग घेता येणार नाही असा आक्षेप घेत भाजपचे विरोधी दोन ग्रामपंचायत सदस्य योगेश पाटील व पै. ऋषिकेश बिरणे आणि संतप्त नागरिकांनी ग्रामविकास अधिकारी यांना ग्रामपंचायतीतून हाकलून दिले.

दरम्यान, गट विकास अधिकारी मोहिते यांनी विरोधी भाजप सदस्य यांच्याशी फोनद्वारे संपर्क साधून सोमवारी ग्रामपंचायतीला प्रत्यक्ष भेट देऊन याबाबत चौकशी करून कारवाई करण्याचे आश्वासन दिल्यानंतर सरपंच मीनल पाटील यांच्या अध्यक्षतेखाली मासिक बैठक पार पडली.

या वेळी भाजपचे विरोधी ग्रामपंचायत सदस्य पै. ऋषिकेश बिरणे म्हणाले की, ग्रामसेवक देसाई यांच्या बद्दल ग्रामस्थांच्या अनेक तक्रारी आहेत. तसेच ग्रामसभेमध्ये झालेले निर्णय स्वतःच्या मर्जीने बदल केलेले आहेत व प्रोसिडिंग मध्ये बदल केलेले आहेत. बोगस ग्रामसभा दाखवून आशा स्वयंसेवक निवडीमध्ये हस्तक्षेप करून पात्र उमेदवारांना डावले आहे. आम्ही ग्रामपंचायत सदस्य असताना आमच्यासमोर झालेले निर्णय बदलले जात आहेत. त्यांच्याबद्दल आम्ही लेखी तक्रार केली आहे, त्याचा निर्णय होईपर्यंत ग्रामविकास अधिकाऱ्यास ग्रामपंचायती मध्ये फिरकू देणार नाही या वेळी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.