प्रतिष्ठा न्यूज

तासगाव तहसील कार्यालयात साप सोडून आंदोलन करण्याचा इशारा

प्रतिष्ठा न्यूज/किरण कुंभार 
तासगाव : तासगाव तालुक्यातील सर्वच गावात अतिवृष्टीमुळे अनेक पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे याबाबत माजी सैनिक जोतीराम जाधव यांनी तात्काळ पंचनामे करून नुकसान भरपाई मिळावी अन्यथा दिनांक 25 पासून अन्नत्याग आंदोलन करण्याचा इशारा तहसीलदार यांना निवेदन देऊन दिला होता.परंतु याबाबत कोणतीही कार्यवाही तहसील कार्यालयाकडून होताना दिसत नाही. त्यामुळे दिनांक 27- 9- 2024 पर्यंत गावनिहाय पंचनामे न झाल्यास तहसील कार्यालयात साप सोडून आंदोलन करू, यावेळी कोणतीही शारीरिक व जीवित हानी झाल्यास याची सर्वस्वी जबाबदारी तहसीलदार यां नात्याने तहसीलदार यांची राहील याबाबतचें निवेदन माजी सैनिक जोतिराम जाधव यांनी तहसील कार्यालय,पोलीस स्टेशनला दिले आहे.
मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.