प्रतिष्ठा न्यूज

स्काऊट राज्यस्तरीय राज्य पुरस्कार चाचणी शिबिरास लातूर येथे प्रारंभ

प्रतिष्ठा न्यूज/ विशेष प्रतिनिधी
लातूर दि.23 : येथील लातूर भारत स्काउटस्आणि गाईडस् जिल्हा कार्यालय येथे विभागीय राज्यस्तरीय राज्य पुरस्कार चाचणी शिबिरास मंगळवारी  प्रारंभ झाला असून  हे शिबिर 22 नोव्हेंबर ते 25 नोव्हेंबर या कालावधीत आयोजित करण्यात आले आहे .या शिबिरात नांदेड व लातूर या जिल्ह्यातील स्काऊट्स सहभागी झाले आहेत . नांदेड जिल्ह्यातून 32 तर लातूर जिल्ह्यातून 68 एकूण स्काऊट्स या शिबिरात सहभागी झाले आहेत . या शिबिरामध्ये स्काऊटचा इतिहास ,प्रार्थना , झेंडा गीत , स्काउट्सचे वचन नियम , मागच्या खुणा , हाताच्या खुणा , आग विझण्याच्या पद्धती , प्रथमोपचार होकायंत्र ,पायोनियरिंग ,नकाशा ,ओझम आणि वॅगज या जागतिक संघटने बद्दलची माहिती आदी प्रशिक्षणावर आधारित या मुलांची चाचणी घेण्यात येणार  आहे .या शिबिराला शिबिर प्रमुख म्हणून सहाय्यक राज्य प्रशिक्षण आयुक्त गोविंद केंद्रे , शिबिर सहाय्यक जनार्दन इरले ,  डॉ . शंकर चामे ,हेमंत बेंडे ,युवराज माने ,सौदागर  एच ए . उपस्थित आहेत .शिबिर यशस्वीतेसाठी राजीव पवार , एल .एम . भोसले , एच .एम. पठाण , एल . एस . मांजरे , एम व्ही . पाटील , यु .बी . किडीले , ए.डब्ल्यू . केंद्रे, , बालाजी तोरणेकर , डी .जी . पाटील  , संजीवकुमार देवनाळे , संतोष      पोलशेटवार , पी . जे . भोसले आदी स्काऊट मास्तर लातूर व नांदेड जिल्ह्यातून  सहभागी झाले आहेत .

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.