प्रतिष्ठा न्यूज

तासगावमध्ये नो पार्किंगच्या त्रासाने नागरिक हवालदिल : शहर फक्त नावालाच अख्या शहरात पार्किंग सोय नाही

प्रतिष्ठा न्यूज/किरण कुंभार
तासगाव : तासगाव मध्ये सध्या नो पार्किंगच्या नावाखाली दोनचाकी आणि चारचाकी वाहन धारकांकडून मोठ्या प्रमाणात दंड वसुली करण्यात येत आहे.येणाऱ्या सर्वच सणांच्या पार्श्वभूमीवर होणारी वाहतूक कोंडी टाळण्यासाठी मात्र कोणतीही उपाय योजना करताना प्रशासन दिसत नाही.शहरात गाड्या पार्किंग करणं नागरिकांना त्रासदायक ठरत आहे.नगरपालिका आणि पोलीस प्रशासनाने संयुक्त पने पार्किंग बाबत उपाययोजना करणे गरजेचे आहे.येणारे सर्वच सण हे मोठे आहेत,त्या अनुषंगाने खरेदीसाठी मोठया प्रमाणात आजूबाजूच्या गावातील लोक तासगाव मध्ये येतात.सध्या पार्किंगची सोय नसल्याने आणि होणाऱ्या दंडात्मक कारवाई मुळे शहरातील व्यापारावर याचा मोठा परिणाम होताना दिसत आहे.पार्किंगची सोय नसल्याने चारचाकी वाहन धारक दिसेल त्या मोकळ्या जागी गाडी पार्क करून खरेदीला जात आहेत.अशावेळी नो पार्किंगच्या आधारे त्यांच्यावर दंडात्मक कारवाई होताना दिसत आहे.दंडात्मक कारवाईच्या धास्तीने शहरात खरेदीसाठी येणारे ग्राहक कमी झाल्याचे दिसून येत आहे.शहरातील मुख्य रोड सोडले तर सर्वच रस्ते अरुंद आहेत.त्यामुळे गाडी पार्किंग करणं लोकांना जिकिरीच झालं आहे.प्रशासनाने फक्त दंडात्मक कारवाई न करता तात्काळ याबाबत निर्णय घेऊन पार्किंगचा प्रश्न मार्गी लावावा अशी मागणी नागरिक करतं आहेत.
मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.