प्रतिष्ठा न्यूज

तासगावात उद्या मराठा क्रांती मोर्चाकडून बंदचीं हाक…

प्रतिष्ठा न्यूज/किरण कुंभार 
तासगाव :जालना जिल्ह्यातील अंतरवाली गावात मनोज जरांगे हे मराठा बांधव आरक्षणासाठी गेल्या काही दिवसांपासून उपोषणास बसले आहेत.हे आंदोलन चिरडून काढण्याच्या उद्देशाने जालना पोलिसांनी उपोषणकर्त्यांवर अमानुष लाठी हल्ला केल्यामुळे,राज्यभरातील मराठा बांधव संतप्त झाले आहेत. याच अनुषंगाने तासगाव मराठा क्रांती मोर्चाची काल सायंकाळी बैठक झाली.त्याच अनुषंगाने आज प्रमुख कार्यकर्त्यांकडून समृद्धी मल्टीपर्पज हॉल येथे पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी तासगावसह तालुक्यातील सकल मराठा बांधवांनी जरांगे यांच्या उपोषणास पाठिंबा दिला असून  उपोषणकर्त्यांवर पोलिसांनी अमानवी पद्धतीने अमानुष लाठी हल्ला केल्याचा निषेध करून उद्या गुरुवारी संपूर्ण तासगाव तालुका बंदची हाक दिली आहे.सकाळी 9 वाजता वरचे गल्ली जिजाऊ चौक येथून मराठा क्रांती मोर्चाला सुरुवात होणार असून शिवतीर्थ येथे त्याची सांगता होणार आहे.त्यानंतर बस स्टॅन्ड चौकात रास्ता रोको,आंदोलन होणार आहे,अशी माहिती मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने देण्यात आली आहे.
मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.