प्रतिष्ठा न्यूज

कवठेमहांकाळ मध्ये होणार दहीहंडीच्या निमित्ताने प्रभोदय

प्रतिष्ठा न्यूज/किरण कुंभार 
तासगाव : स्वर्गीय आर आर आबांच्या समझोता एक्सप्रेस नंतर संजय काकांचे विधानसभेचे स्वप्न अधुरेच राहिले.बदलत्या राजकीय परिस्थितीमध्ये सांगली जिल्ह्याचा साठ वर्षाचा इतिहास मोडीत काढीत संजय काका खासदार झाले.सद्यपरिस्थिती पाहता नऊ वर्षे लाभलेली खासदारकी आणि संजय काका या नावाचे जिल्हाभर असणारे वलय यामुळे तासगाव कवठे महांकाळ विधानसभा मतदार संघांमध्ये संजय काकांची ताकद निर्णायक झाली आहे.त्यामुळे दोन वेळा निसटता पराभव स्वीकारून हुलकावणी दिलेली आमदारकी पुन्हा एकदा पुत्र प्रभाकरच्या रूपाने जिंकायचीच यासाठी पायाला भिंगरी बांधून खासदार कुटुंबीय गेली वर्षभर मतदारसंघात पेरणी करत आहे.कवठेमहांकाळच्या श्री महांकाली हायस्कूलच्या मैदानात मंगळवारी 12 सप्टेंबरला सायंकाळी 6 वाजता खा.संजय काका पाटील युवाशक्ती आनी प्रभाकर बाबा पाटील युवाशक्ती कडून मानाच्या पहिल्या *प्रभोदय दहीहंडी* उत्सवाचें आयोजन करण्यात आले आहे.त्या निमित्ताने खासदार गटाकडून तरुणांना *यायलाच लागतंय* अशी साद घालून जोरदार शक्ति प्रदर्शनाची तयारी सुरु असल्याचे बोलले जात आहे.खासदारपुत्र प्रभाकर पाटील हें आगामी विधानसभा निवडणुकीत भाजपा कडून निवडणुकीत उतरणार असल्याची चर्चा आता जोर धरू लागली आहे.याच पार्श्वभूमीवर खासदार पितापुत्र तालुक्यातील जनतेच्या समस्याचा आढावा घेऊन त्या सोडवण्यासाठी प्रयत्न करताना दिसून येत आहेत.भाजपच्या तासगाव कवठे महांकाळ विधानसभा निवडणुक प्रमुख पदाची जबाबदारी आल्यापासून प्रभाकर पाटील हें दोन्ही तालुक्यातील प्रत्येक गावात जाऊन युवकांचे संघटन करताना दिसून येत आहे.दोन्ही तालुक्यात कोट्यावधी रुपयांचा निधी आणून,विकास कामांच्या माध्यमातून आपल्या कामाचा ठसा उमटवण्यात खासदार यशस्वी होताना दिसत आहेत.प्रभोदय दहीहंडीच्या निमित्ताने युवाशक्ती एकत्र करून खासदार येणाऱ्या निवडणुकांचे रनशिंग फुंकनार असल्याची चर्चा जोर धरत आहे.
मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.