प्रतिष्ठा न्यूज

माणसाच्या जीवनामध्ये उचित वर्तनाला फार महत्वाचे : प.पु.परमात्मराज महाराज (आडी)

प्रतिष्ठा न्यूज/किरण कुंभार 
तासगाव : माणसाच्या जीवनात उचित वर्तणाला फार महत्व आहे,म्हणून उचित वर्तनाची सवय लावून घ्यायला पाहिजे अन्यथा अनुचित वर्तनाचे अनिष्ट फळ भोगावे लागते,असे प्रतिपादन प.पू.परमात्मराज महाराज यांनी केले. ते आडी (ता.निपाणी) येथील संजीवन गिरीवरील श्री दत देवस्थान मठाच्या वतीने भाद्रपद पौर्णिमेच्या निमित्ताने सर्वेज्य सांस्कृतिक भवनात आयोजित प्रवचन कार्यक्रमात बोलत होते.यावेळी सकाळी श्रीदत्त मंदिरात श्री दत्तगुरूंच्या चरणांवर अभिषेक अर्पण करून महाआरती करण्यात आली. रात्री साडेसात वाजता नामजपा नंतर आयोजित प्रवचन कार्यक्रमात बोलताना प.पू.परमात्मराज महाराज पुढे म्हणाले,देश काल परिस्थितीला अनुकूल चांगले योग्य रीतीने वागणे म्हणजे समुचित वर्तन होय.इंद्रदेवाने एकदा वामदेव ऋषींना आमंत्रित केले होते,त्यावेळी पाद्यपूजा चालू असतांनाच एका गंधर्वाला नृत्य गायनाची तीव्र इच्छा झाली.नृत्य गायनात दंग असलेल्या त्या गंधर्वाचा वामदेव ऋषींना पाय लागला अशा वेळी त्या उद्दाम गंधर्वाने ऋषींची माफी सुद्धा मागितली नाही.तेव्हा ऋषींनी गंधर्वाला उंदराच्या योनीत जन्म घेण्याचा शाप दिला.चूक लक्षात आल्यावर माफी मागणाऱ्या त्या क्रौंच गंधर्वाला उःशाप रूपात उंदराच्या योनीत राहूनच गणपतीचे वाहन होण्याचा मान मिळाला.त्या गंधर्वाच्या अनुचित वर्तनामुळे त्याला उंदीर होण्याचा शाप भोगावा लागला. नदीकाठावर असलेल्या झाडावर एक पक्षी जोडपे आनंदात बागडत असतांना एका पारध्याने त्यातील नर पक्षाला मारले.तेव्हा मादी पक्षी शोक करू लागली.हा प्रकार महर्षी वाल्मीकि यांनी पाहिला.शोकाकूल पक्षिणीला पाहून महर्षींनी पारध्याला शाप दिला.या घटनेनंतर महर्षी वाल्मीकिंना रामायण लिहिण्याची इच्छा झाली.या घटनेवरून अनुचित वर्तनाचे फळ अनिष्ट मिळते,असा बोध होतो.त्रेतायुगात रामावतार काळात नल – नील या कुशल अभियंत्यांनी समुद्रावर सेतू बांधला. पुढे द्वापर युगात अर्जुनाने सेतू पाहून हा सेतू मी बाणांद्वारे कमी वेळात बांधला असता,असे म्हणून अवहेलना केली.तेव्हा तिथेच असणाऱ्या म्हाताऱ्याच्या रूपातील हनुमंताने अर्जुनाला बाणांचा सेतू बांधण्यास सांगून तो सेतू मोडूनही टाकला.तेव्हा अर्जुनाने हनुमंताला ओळखून माफी मागितली आणि युद्ध प्रसंगी रथावर राहण्याची विनंती केली.अर्जुनाकडून आधी चूक झाली परंतु नंतर माफी मागण्याचे उचित वर्तन केले.समुचित वर्तन घडावे.योग्य वागणे व्हावे यासाठी घडलेल्या घटनांवरून बोध घ्यायला पाहिजे.माणसाच्या हातून अनुचित वर्तन होऊ नये.उचित आणि अनुचित वर्तन स्थलकाल परिस्थितीवर अवलंबून आहे. अनुचित वर्तन गरीब,मध्यमवर्गीय अथवा श्रीमंत असे कोणाकडूनही होऊ शकते.सर्वांनी समुचित वर्तन करणे आवश्यक आहे.अवगुणामुळे अनुचित वर्तन होत असते. वासनारूपी शेळीचे पोट कधीच भरत नाही.त्यामुळे वासनांवर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे.दोन मित्र जंगलातून फिरत होते.तेव्हा अचानक त्यांच्या समोर एक अस्वल आलं. त्यातील एकटा कसलाही विचार न करता झटपट एका झाडावरती चढला.दुसऱ्याला काही कारणांमुळे झाडावर चढता येत नव्हते.तो तिथेच झोपला ते अस्वल तिथे आले आणि त्याने त्या दुसऱ्या व्यक्तीला सुंघले. त्याला वाटले की हा मेलेला आहे. त्यामुळे ते निघून गेले.तेव्हा झाडावरती चढलेल्या मित्राने खाली येऊन विचारले की त्या अस्वलाने तुझ्या कानात काय सांगितले ? तेव्हा तो दुसरा मित्र म्हटला, “संकटात जो मदतीला धावतो तोच खरे मित्र असतो,” असे सांगितले.जीव वाचवण्यासाठी झाडावर चढणे योग्य असले तरी सोबतच्या मित्राचीही काळजी घेणे गरजेचे होते. त्याच्याकडून तसे घडले नाही. त्यामुळे ते अनुचित वर्तन ठरले.हसणे आरोग्यासाठी चांगले आहे म्हणून एखादा मृत व्यक्तीच्या घरी जाऊन हसू लागल्यास ते अनुचित ठरेल. त्यामुळे स्थलकालादिकांचा सारासार विचार करून सुयोग्य आचरण करावे. सुयोग्य आचरणाची सवय लावावी, असे सांगितले.यावेळी जगदेव मामा ग्रूप इचलकरंजी यांच्यावतीने महाप्रसादाची सोय करण्यात आली होती.रंगराव पाटील गिरगाव,राजेश निकम हुपरी,अमर खोत,उत्तम खोत पुणे,अभय शास्त्री हुपरी,सागर गुरव कागल यांनी विविध गुरुवारी अन्नदान केल्याबद्दल त्यांचा व अभिजित पोवार (अकिवाट) शान्ता धनवडे (जि. सांगली) इत्यादी देणगीदारांचा सत्कार करण्यात आला.तसेच खानापूर (जि. बेळगांव) भागात कार्य करणाऱ्या व इतरही अनेक आदर्श शिक्षकांचा व मान्यवरांचा प.पू. परमात्मराज महाराज व देवीदास महाराज यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.यावेळी आडी, बेनाडी, हंचिनाळ,कोगनोळी पंचक्रोशीसह कोल्हापूर, बेळगांव, खानापूर, सांगली, पुणे, मुंबई, सिंधुदुर्ग इ.भागातील व कर्नाटक, महाराष्ट्र व गोवा राज्यांमधील हजारो भाविकांनी प्रवचन व महाप्रसादाचा लाभ घेतला.
मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.