प्रतिष्ठा न्यूज

सांगलीतील अति धोकादायक इमारतींचे भाग महापालिकेने पाडले

प्रतिष्ठा न्यूज
सांगली प्रतिनिधी : सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिकेचे आयुक्त तथा प्रशासक शुभम गुप्ता यांच्या आदेशानुसार महापालिका क्षेत्रातील धोकादायक आणि अति धोकादायक इमारती निष्कषित करण्याची सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिकेचे आयुक्त तथा प्रशासक शुभम गुप्ता यांच्या आदेशानुसार महापालिका क्षेत्रातील धोकादायक आणि अतिधोकादायक इमारती निष्कषित करण्याची मोहीम सुरू आहे.

प्रभात 1 अंतर्गत 40 धोकादायक इमारतींपैकी तीन इमारती या अति धोकादायक मध्ये आहेत. यापैकी एका इमारतीचा पुढील धोकादायक भाग आज महापालिकेने निष्कासित केला. उपायुक्त वैभव साबळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक आयुक्त सहदेव कावडे, बांधकाम विभागाचे उपअभियंता महेश मदने , स्वच्छता निरीक्षक प्रणील माने, धनंजय कांबळे, वैभव साबळे यांच्या पथकाने ही कारवाई केली.

पेठभाग कन्या शाळे शेजारील श्री . गलगले यांच्या इमारतीचा धोकादायक असणारा समोरील भाग आज महापालिकेचे सहाय्यक आयुक्त सहदेव कावडे यांच्यासह पथकाने निष्काशित केला. तर उर्वरित दोन अति धोकादायक इमारतींच्या समोर महापालिकेने अतीधोकादायक म्हणून फलक लावला आहे.मोहीम हाती घेण्यात आली आहे.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.