प्रतिष्ठा न्यूज

तासगावचे लाईफकेअर मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल हे मुख्यमंत्री सहायता निधीसाठी शासनाकडून अंगीकृत … गोर गरीब,गरजू लोकांना मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्ष देणार निधी

प्रतिष्ठा न्यूज/किरण कुंभार
तासगाव:तासगावचे लाईफकेअर मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल हे मुख्यमंत्री सहायता निधी साठी शासनाकडून अंगीकृत करण्यात आल्याची माहिती लाईफ केअर मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलचा संचालक डॉक्टर ज्ञानेश्वर शिवणकर यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.
गोर गरीब,गरजू लोकांना मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्ष कडून या हॉस्पिटलमधल्या रुग्णांसाठी निधी मिळणार असून या योजनेमध्ये
खर्चिक उपचारांचा समावेश असून या अंतर्गत-शस्त्रक्रियेसाठी गरजूंना मदत मिळणार असल्याची माहिती डॉक्टर शिवणकर यांनी दिली.अल्पवधीतच केवळ तासगाव तालुका नव्हे तर पलूस,खानापूर,आटपाडी तालुक्यातील रुग्णांसाठी योग्य तो उपचार माफक दरात करून लाईफ केअर हॉस्पिटलने स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे.या हॉस्पिटलमध्ये मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून रुग्णांना मदत मिळणार असल्याची माहिती देण्यासाठी आयोजित पत्रकार परिषदेत डॉक्टर शिवणकर बोलत होते.यावेळी बोलताना डॉक्टर ज्ञानेश्वर शिवणकर म्हणाले गरजू रुग्णांना उपचारासाठी व शस्त्रक्रियेसाठी मुख्यमंत्री सहाय्यता कक्ष निधीच्या माध्यमातून मदत उपलब्ध करून देण्यात येते.मुख्यमंत्री सहाय्यता निधीच्या निकषात यापूर्वी समावेश नसलेल्या अनेक खर्चिक आजारांचा समावेश करण्यात आला आहे.यामधे फुफ्फुसाची शस्त्रक्रिया,गुडघे बदल,खुबा बदल शस्त्रक्रिया,यांचा समावेश आहे तसेच अपघातामधील रुग्णांना ही या योजनेतून आर्थिक मदत दिली जाणार आहे.गरजू व आर्थिकदृष्ट्या कुमकुवत असणाऱ्यांना चांगले वैद्यकीय उपचार मिळवून देण्याच्या अनुषंगाने मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्ष सुरू करण्यात आले आहे.अपघातजन्य शस्त्रक्रिया,जन्मत: कर्णबधिर मुलांच्या कॉक्लिअर इंप्लांट शस्त्रक्रियेसाठी, हृदय शस्त्रक्रिया,फुफ्फुस प्रत्यारोपण, बोनमॅरो व हृदय प्रत्यारोपण शस्त्रक्रिया,गुडघा व खूब बदल शस्त्रक्रिया,मेंदूरोग,कर्करोग,लहान बालकांचे आजार,अपघातातील शस्त्रक्रिया,डायलिसिस,केमोथेरपी, महात्मा फुले जन आरोग्य योजनेत न बसणाऱ्या उपचार आदी साठी मुख्यमंत्री सहायता कक्ष निधीतून मदत होणार आहे.मा.मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे साहेब, मुख्यमंत्री वैधकीय सहाय्यता कक्ष प्रमुख मा.मंगेश चिवटे साहेब,तासगाव कवठेमहांकाळ तालुका वैदयकीय सहाय्यता प्रमुख सचिन शेटे यांच्या विशेष प्रयत्नातून तासगाव मधे लाईफकेअर मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल ला मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी (CMRF) अंगीकृत करण्यासाठी मदत झाल्याचे डॉक्टर शिवणकर यांनी सांगितले.
मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.