प्रतिष्ठा न्यूज

संत रविदास बहुभाषिक जनहित सेवा समितीच्या वतीने शिव जयंती साजरी

प्रतिष्ठा न्युज/ सुखदेव रावळकर
भोकरदन : संत रविदास बहुभाषिक चर्मकार जनहित सेवा समिती तथा महाराष्ट्र ग्रामीण व शहरी श्रमिक इमारत बांधकाम कामगार संघाच्या संयुक्त विद्यमाने छत्रपती शिवाजी महाराज यांची 396 वी जयंती मोठ्या थाटात संपन्न झाली यावेळी समितीचे संस्थापक अध्यक्ष महादु सुरडकर त्यांच्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पुजन करुण पुढील कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली यावेळी कामगार संघाचे मराठवाडा अध्यक्ष सुखदेव रावळकर माजी सरपंच सिद्धार्थ वेलदोडे भूषण देशमुख राजेंद्र दारुडे पत्रकार युवराज पगारे वाघ सर नामदेव सुरडकर समाधान वाघ रामदास इंगळे व इतर मान्यवर हजारोच्या संख्येने उपस्थित होते यावेळी संघाचे संस्थापक अध्यक्ष यांनी शिवाजी महाराजांचा पुरोगामी काळातील इतिहास आजच्या पीढीला वाचने गरजेचे आहे आसे प्रतिपादन केले यावेळी इतर कामगार कार्यकर्ते उपस्थित होते.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.