प्रतिष्ठा न्यूज

विटा – म्हैसाळ रस्त्याचे फोर लेन काँक्रीटिकरण करा.. प्रशांत केदार यांचे केंद्रीय सडक परिवहन व राज्यमार्ग मंत्री नितीन गडकरी यांना निवेदन

प्रतिष्ठा न्यूज/किरण कुंभार 
तासगाव : राष्ट्रीय महामार्ग अखत्यारीत असणारा विटा – म्हैसाळ रस्ता क्र.160 वाहतुकीस अरुंद आहे.अरुंद रस्त्यावरील वाहतूक कोंडी फोडून अपघाताचे प्रमाण कमी करण्यासाठी या रस्त्याचे *फोर लेन सिमेंट काँक्रीटीकरणं करावे अशी मागणी दलित महसंघाचे जिल्हाध्यक्ष प्रशांत केदार यांनी केंद्रीय सडक परिवहन व राज्यमार्ग मंत्री नितीन गडकरी व राष्ट्रीय महामार्ग कार्यकारी अभियंता मुधाळे यांचेकडे निवेदनाद्वारे केली आहे* दिलेल्या निवेदनात म्हंटले आहे की, राष्ट्रीय महामार्ग क्र.160 मधील विटा ते म्हैसाळ रस्ता 65 लांबीचा किमीचा असून तो खूप अरूंद आहे.हा रस्ता सांगली,मिरज,तसेच कर्नाटक राज्यात जाण्याचा प्रमुख मार्ग आहे.तसेच हा रस्ता कराड-नागज,कराड-जत,आणि रत्नागिरी-नागपूर रस्त्यांना जोडणारा प्रमुख महामार्ग आहे.पूर्वी विटा ते कुमठे फाटा रस्ता जुना राज्यमार्ग होता.तर कुमठे फाटा ते म्हैसाळ रस्ता जुना जिल्हामार्ग होता.परंतु 2017 मध्ये सदर रस्ता राष्ट्रीय महामार्गाकडे वर्ग करण्यात आला आहे.त्यामुळे या अरुंद रस्त्यावर वाहतुकीची वर्दळ पूर्वीपेक्षा अधिक वाढली आहे.परंतु रस्ता मात्र जैसे थे अरुंदच आहे.रस्त्याच्या दोन्ही बाजूला झाडे-झुडपांनी अतिक्रमण केले आहे.त्यामूळे रस्त्याला साईड पट्ट्या नाहीत.एकाच अरुंद रस्त्यावरून दुहेरी वाहतूक करणाऱ्या वाहनधारकांना आपला जीव मुठीत घेऊन प्रवास करीत आहेत.सदर रस्त्याच्या दोन्ही बाजूला बागायती क्षेत्र मोठे असल्याने रस्ता अनेक ठिकाणी खचला आहे.रस्त्याला समांतर पातळी नाही.पावसाचे पाणी रस्त्यावर साचून मोठे खड्डे पडत आहेत.रस्त्यावरील खड्यांवर दुरुस्तीच्या नावाखाली प्रतिवर्षी कोट्यावधी रुपये खर्ची पडत आहेत.यातुन ठेकेदार व अधिकारी यांना लक्ष्मीदर्शन आहे.देखभाल दुरुस्तीवर कोट्यावधी रुपये खर्चून वाहतूक कोंडी व अपघाताचा प्रश्न सुटणार नाही.त्यावर ठोस कायम स्वरूपी उपाययोजना गरजेची आहे.तेंव्हा मागणीप्रमाणे विटा-म्हैसाळ रस्त्याचे फोर लेन काँक्रीटीकरण करावे,असे निवेदनात  प्रशांत केदार यांनी म्हंटले आहे..अन्यथा या प्रश्नाकडे लक्ष वेधण्यासाठी वेळोवेळी निदर्शने व आंदोलनाची भूमिका घेणार असल्याचे केदार यांनी निवेदनात म्हंटले आहे.
मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.