प्रतिष्ठा न्यूज

जागतिक परिचारिका दिनानिमित्त सांगली महापालिकेच्या परिचारिकांनी लुटला सांस्कृतिक कार्यक्रमाचा आनंद

प्रतिष्ठा न्यूज
सांगली प्रतिनिधी : सांगली मिरज आणि कुपवाड महापालिकेच्या विविध हेल्थ पोस्ट आणि दवाखान्यातील महिला परिचारिकांनी जागतिक परिचारिका दिन साजरा केला. यानिमित्ताने आयोजित सांस्कृतिक कार्यक्रमात परीचारिका व त्यांच्या कुटुंबीयांनी सहभागी होत आनंद लुटला. आयुक्त सुनील पवार आणि उपआयुक्त स्मृती पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम पार पडला.

मिरजेतील बालगंधर्व नाट्यगृह येथे मनपाच्या सर्व दवाखान्यातील परिचारिकांनी एकत्र येत परिचारिका दीन साजरा केला. प्रारंभी आद्य परिचारिका(नर्स) फ्लॉरेन्स नाइटिंगेल यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. सीमा बारस्कर यानी गणेश वंदना सादर केली. यानंतर महापालिकेच्या विविध दवाखान्यातील महिला परिचारिकांनी विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले. यामध्ये फॅशन शो, लावणी नृत्य, गायन आदी कार्यक्रमात परिचारिकांनी सहभाग घेतला. या सर्व कार्यक्रमाचे आयोजन मीनाक्षी पोळ आणि सुनंदा माळी यांनी केले. सूत्रसंचालन महापालिकेचे ब्रँड ॲम्बेसेडर दीपक चव्हाण आणि किरण आनंदे यांनी केले.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.