प्रतिष्ठा न्यूज

तासगाव राष्ट्रवादी कार्यालयात पक्ष चिन्ह अनावरण सोहळा संपन्न

प्रतिष्ठा न्यूज/किरण कुंभार 
तासगाव : येथील राष्ट्रवादी कार्यालयात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार या पक्षाचे नुतन पक्ष चिन्ह अनावरण सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला.यावेळी तालुक्यातील विविध पदाधिकारी व कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते.यावेळी स्व. आर.आर.आबा पाटील यांच्या प्रतिमेस पुष्पाहार अर्पण करून पक्ष चिन्ह अनावरण सोहळा होताच तुतारीचा एकच नाद घूमला. निवडणूक आयोगाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार या पक्षास नुकतेच तुतारी हे पक्ष चिन्ह दिले.या निमित्ताने तासगाव कवठेमहांकाळ विधानसभा मतदार संघाच्या आमदार सुमनताई आर.आर.आबा पाटील,युवानेते रोहीत  पाटील,जिल्हा बँकेचे संचालक सुरेश पाटील यांच्या नेतृत्वाखाली या सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.दरम्यान तासगाव तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार या पक्षाचे चिन्ह तासगाव कवठेमहांकाळ विधानसभा मतदार संघात तळा गाळा पर्यंत पोहचवून येणाऱ्या काळातील आगामी निवडणूका मोठ्या ताकतीने लडवू अशी ग्वाही उपस्थीत सर्व पदाधिकारी यांनी दिली.यावेळी तालुका अध्यक्ष  विश्वास पाटील,महिला अध्यक्षा  नलिनी पवार,युवक अध्यक्ष दत्तात्रय हावळे,अँड.गजानन खुजट,रविंद्र पाटील,अमोल पाटील,अमोल नाना शिंदे,बशीर मोमीन,युवक शहर  अभिजित पाटील,बाळासाहेब गुरव, संध्याताई मंडले,शुभांगी  साळुंखे,उन्नती कोळी,सुजाता पाटील, अर्चनाताई गेंड,संगीता कोकाटे, सुशीला माळी,सत्वशीला  पाटील,सोनाली पाटील,निर्मला मोहिते,पूनम माळी,अरविंद पाटील, सायाजी पाटील,अभिनंदन कोगनोळे, संतोष पाटील,सुरेश सरडे,स्वप्नील जाधव,विठ्ठल पाटील,अक्षय शिंदे व आजी माजी पदाधिकारी उपस्थीत होते.
मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.