प्रतिष्ठा न्यूज

आटपाडीची जनताच सांगत आहे संजयकाकांची विकास कामे ; सौ. ज्योतीताई पाटील यांचा प्रचार दौरा

प्रतिष्ठा न्यूज
आटपाडी प्रतिनिधी : सांगली लोकसभा मतदारसंघातील भाजपा महायुतीचे उमेदवार संजयकाका पाटील यांच्या प्रचारार्थ आटपाडी तालुक्यातील विविध गावांमध्ये सौ. ज्योतीताई संजयकाका पाटील यांनी दौरा केला. जाईल तिथे महिला व नागरिक संजयकाका पाटील यांनी केलेली विकास कामे स्वतः सांगत असून कामाची पोहच पावती मिळत आहे.
कु. वैष्णवीदीदी पाटील, सौ.ऐश्वर्याताई हर्षवर्धन देशमुख, सौ.अपर्णाताई देशमुख, सौ.अंजना इंगवले, मा.अंजली भोसले, सौ. तेजश्री देशमुख, शुभांगी कदम, कल्पना पाटील, पूजा ढगे , रेखा जुगडार, सुनंदा जुगडार, सौ.राजाक्का कटरे, घानंद गावच्या सरपंच कविता कटरे, सदस्य निलंता व्हणमाने, स्वाती कटरे,
खरसुंडीचे सरपंच धोंडीराम इंगवले, वैभव पुजारी, एकनाथ भोसले, छगन साळुंखे, विवेक पुजारी, मोहन भोसले सहभागी झाले होते.
खरसुंडी, घानंद, कामत, आटपाडी, दिघंची, निंबवडे, आवळापूर, विठलापूर गावांचा दौरा आज सोमवारी केला. येथील महिला भगिनी व नागरिकांशी चर्चा केली. महिला भगिनींना खासदार संजयकाका पाटील यांच्या माध्यमातून झालेल्या विकास कामांबद्दल संबोधन केले. देशाच्या आणि जिल्ह्याच्या अविरत विकासासाठी आणि नरेंद्र मोदी यांना पुन्हा पंतप्रधान करण्यासाठी सांगलीत संजयकाका पाटील यांना मोठ्या मताधिक्याने विजयी करण्याचे आवाहन करण्यात आले.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.