प्रतिष्ठा न्यूज

मंत्री सुरेश भाऊ खाडेंचा महिलांसाठी हळदी कुंकवाचा कार्यक्रम उत्साहात संपन्न

प्रतिष्ठा न्यूज / योगेश रोकडे
मिरज : समाजातील सर्व थरांच्या स्त्रियांत विशेषप्रसंगी स्त्रियांसाठी हळदीकुंकू समारंभ करण्याची प्रथा आजतागायत सुरू आहे. चैत्रगौरीचे चैत्रतीज ते अक्षय्यतृतीयेपर्यंत होणारे चैत्र वा वासंतिक हळदीकुंकू व संक्रांतीनिमित्त होणारे संक्रांत ते रथसप्तमी या काळात होणारे हळदकुंकू ही मोठ्या प्रमाणात आहेत. हे समारंभ म्हणजे गृहिणीपूजन आदरसत्कार व स्नेहमीलन हा सामाजिक ऐक्यासाठी आवश्यक गोष्टीचे प्रतीक आहे.
     कुंकू सौभाग्य प्रतीक मानल्यामुळे भारतीय संस्कृतीत त्याचा अनेक शुभ कार्यात वापर सुरू झाला. स्त्रियांचे कुंकू हे लेणे ठरले. देवादिकांच्या पूजेत कुंकू अनिवार्य झाल़े लग्नपत्रिकेत कुंकू लावून मग ती नातेवाईक, आप्तेष्टांना हितचिंतकांना पाठवण्याची प्रथा सुरू झाली. हिंदु स्त्रिया नवे वस्त्र परिधान करायला काढताना त्या कापडाला प्रथम कुंकू लावतात. कुंकू हे सुवासिनीला सुवासिनीनेच लावायचे असते. विवाहप्रसंगी कित्येक ज्ञातीत वधूच्या कपाळी कुंकवाचा मळवट भरतात. सुवासिनी घरातून बाहेर पडताना घरची गृहिणी तिला कुंकू लावत़  `तुझे सौभाग्य अक्षय्य राहो’ अशी उदात्त, महन्मंगल भावना त्यामागे असते. मांगलिक कार्यात पुरूषांनाही कुंकू लावले जाते.
       आजच्या विज्ञानाच्या प्रगत युगातही भारतात कुंकू लावण्याची पद्धत अद्यापि चिरंतन आहे. म्हणूनच हिंदू संस्कृतीने तेज चिरंतन असून हाच भारतीय संस्कृतीचा मूलाधार आहे.
           मकर संक्रांती ते रथसप्तमी या काळात हिंदू घरातून हळदी कुंकू समारंभ केला जातो. अलीकडे त्याला सार्वजनिक स्वरूपही दिले आहे. त्यानिमित्ताने संघटन व्हावे, एकोपा वाढावा आणि संस्कृतीचे संवर्धन व्हावे हा उदात्त हेतू  ठेवून पालकमंत्री  सुरेशभाऊ खाडे व त्यांच्या पत्नी सुमनताई खाडे यांनी मिरज येथील त्यांच्या मातोश्री तानुबाई दगडू खाडे इंग्लिश स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज मिरज येथे हळदी कुंकू कार्यक्रमाचे आयोजन केले होते. यावेळी मिरज शहराबरोबरच आजूबाजूच्या गावातून ही साधारण दहा हजार महिलांनी उपस्थिती लावली होती.
        यावेळी खाडे कुटुंबियातील सुमनताई खाडे, स्वाती खाडे, रसिका खाडे त्याचबरोबर खासदार संजयकाका पाटील यांच्या पत्नी ज्योती पाटील व सूनबाई  शिवानी पाटील यांनी उपस्थिती लावली होती. यावेळी महिलांच्या मनोरंजनाच्या कार्यक्रमांचे नियोजन करण्यात आले होते. यासाठी भाजप महिला पदाधिकारी व मतदार संघातील महिलांची मांदियाळी आली होती. या कार्यक्रमामध्ये सर्व महिलांना हळदी कुंकू लावून वाण देण्यात आले. या कार्यक्रमाची सांगता गोड आशा अल्पोपहाराने करण्यात आली.
मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.