प्रतिष्ठा न्यूज

विधान परिषद विरोधी पक्षनेते अंबादासराव दानवे यांनी हजारो शिवसैनिक, शेतकरी, कार्यकर्ते यांच्याशी शुक्रवारी साधला संवाद

नैसर्गिक संकटात सापडले ल्या शेतकऱ्यांना वाढीव मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार

प्रतिष्ठा न्युज / राजू पवार
नांदेड दि. 12 : विधान परिषद विरोधी पक्षनेते व शिवसेना जिल्हाप्रमुख संभाजीनगर माननीय श्री अंबादासराव दानवे हे शुक्रवार दिनांक १२ रोजी नांदेड दौऱ्यावर आले होते. सकाळी देवगिरीने ८.३० वाजता नांदेड रेल्वे स्टेशन येथे आगमन झाल्यावर शेकडो शिवसैनिक कार्यकर्ते यांनी जंगी स्वागत केले. तसेच सकाळी नांदेड येथे विश्रामगृह येथे शेतकरी, पूरग्रस्त यांच्या व्यथा जाणून घेतल्या. तसेच कार्यकर्त्यांशी संवाद साधला. तसेच नांदेड तालुक्यातील निळा येथील अतिवृष्टीग्रस्त भगास थेट बांधावर जाऊन भेट , पाहणी व शेतकऱ्यांशी सवांद साधला. त्यानंतर पासदगाव, नांदुसा भागात पुराच्या पाण्याने नुकसान झालेल्या शेतीची पाहणी केली. नुकसानग्रस्त भागाचा आढावा घेतला. त्याचप्रमाणे शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता पाटील कोकाटे यांच्या संपर्क कार्यालयास सदिच्छा भेट दिली. अर्धापूर तालुका महादेव पिंपळगाव येथील अतिवृष्टीग्रस्त शेतीची पाहणी व शेतकऱ्यांशी हितगुज. केली. दुपारी अर्धापूर तालुका मेंढला नाला पाण्याने झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यात आली.यावेळी त्याच्या सोबत, नियोजित दौऱ्यात माजी खासदार सुभाष वानखेडे, जिल्हाप्रमुख दत्ता पाटील, बीडचे संपर्क प्रमुख धोंडू पाटील, माजी आमदार नागेश पाटील आष्टीकर, माजी आमदार अनुसयाताई खेडकर, माजी आमदार रोहिदास चव्हाण, सह संपर्क प्रमुख प्रकाश मारावार, भुजंग पाटील, डॉ.मनोज भंडारी, भालचंद्र नाईक, संतोष अंबुलगेकर, तानाजी पवार, रविंद्र बंडेवार, जिल्हा संघटक दयाल गिरी आदी मान्यवर उपस्थित होते. अतिवृष्टी अतिवृष्टीग्रस्त भागातील शेतक-याना भरीव मदत मिळवून देण्यासाठी मुख्यमंत्री ना. एकनाथ शिंदे , उपमुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस यांच्या कडे पाठपुरावा करू असे आश्वासन त्यांनी दिले.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.