प्रतिष्ठा न्यूज

सौ.रेखा राजाराम काळे बालक मंदिर तासगाव शाळेचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात

प्रतिष्ठा न्यूज/किरण कुंभार
तासगाव : सौ.रे.रा काळे बालक मंदिर तासगावचे शिशुगट लहान गट व मोठा गटाचे स्नेहसंमेलन व वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ मंगळवार दिनांक 2 जानेवारी रोजी उत्साहात संपन्न झाला.याप्रसंगी अध्यक्ष म्हणून माजी सुभेदार मा.श्री .श्रीकांत पांडुरंग साळुंखे उपस्थित होते तर प्रमुख अतिथी म्हणून मा.श्री. जयदीप गजानन वाटवे व वैद्य सौ. वरदा जयदीप वाटवे उपस्थित होते.अध्यक्ष श्री.श्रीकांत साळुंखे यांच्या हस्ते हस्तकला प्रदर्शनाचे उद्घाटन झाले.यावर्षी अयोध्येतील राम मंदिराचा हुबेहूब देखावा हस्तकला प्रदर्शनात उभा केला होता.मंगळवारी दुपारी’ स्वरलहरी’ हा विविध गुणदर्शनाचा कार्यक्रम संपन्न झाला. या कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून मा. श्री.सुदर्शन पाटील व सौ.तेजश्री पाटील उपस्थित होते.बाल कलाकारांचा कलाविष्कार हा तासगावात कौतुकाचा विषय ठरला.याप्रसंगी सांगली शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष मा.श्री.रवींद्रजी देवधर साहेब,रा.गो मराठे बाल शाळेचे मुख्याध्यापक श्री.सुभाष बल्लाळ सर, शालाधिक्षक डॉ.चंद्रकांत बेडगे सर, बालक मंदिर पर्यवेक्षिका सौ.पल्लवी जोशी बाल शाळा पर्यवेक्षक श्री. वसंत सकटे, बालक मंदिर स्नेहसंमेलन कार्याध्यक्ष सौ.सुप्रिया जोशी,बाल शाळा स्नेहसंमेलन कार्याध्यक्ष श्री. वैभव राव तसेच बालक मंदिर सर्व शिक्षक व बाल शाळा सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी  विद्यार्थी व पालक उपस्थित होते.
मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.