प्रतिष्ठा न्यूज

सांगली महानगरपालिकेचा 26 वा वर्धापन दिन उत्साहात साजरा ; महापालिकेचे मोबाईल ॲपचे लॉन्चिंग

प्रतिष्ठा न्यूज
सांगली प्रतिनिधी : सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिकेचा 26 वा वर्धापन दिन उत्साहात साजरा करण्यात आला वर्धापन दिनानिमित्त सकाळी महापालिका मुख्यालयात दीपप्रज्वलन करण्यात आले. यावेळी आयुक्त तथा प्रशासक श्री सुनील पवार , अतिरिक्त आयुक्त चंद्रकांत खोसे, उपायुक्त राहुल रोकडे, वैभव साबळे, स्मृती पाटील, पंडित पाटील यांच्यासह महापालिका अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.

यावेळी 26 व्या वर्धापन दिनानिमित्त मनपा मुख्यालयात केक कापण्यात आला. यावेळी महापालिकेच्या वतीने मोबाईल ॲपचे लॉन्चिंग आयुक्त तथा प्रशासक श्री सुनील पवार यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी आयुक्त सुनील पवार यांनी सर्वांना मार्गदर्शन करत असताना आपल्या कारकिर्दीबाबत महिती देत आपले अनुभव सर्वांसमोर मांडले. यावेळी अनेक कर्मचारी, अधिकारी यांनी आपल्या महापालिकेबद्दल आपल्या भावना व्यक्त केल्या. यानंतर महापालिका क्षेत्रातील मालमत्तांचे ड्रोन द्वारे करण्यात येणाऱ्या सर्वेक्षणाचे उद्घाटन ही आयुक्त तथा प्रशासक सुनील पवार यांच्या हस्ते करण्यात आले.

महापालिका क्षेत्रातील मालमत्तांचं आता ड्रोनद्वारे सर्वेक्षण केले जाणार असून यामुळे अनेक मालमत्ता या घरपट्टी विना असल्याचे समोर येणार आहे. अशा मालमत्तांना घरपट्टी लावून महापालिकेचे उत्पन्न वाढवण्याच्या दृष्टीने हा ड्रोन सर्वे केला जात आहे
यावेळी अतिरिक्त आयुक्त चंद्रकांत खोसे, उपायुक्त राहुल रोकडे, वैभव साबळे, स्मृती पाटील, पंडित पाटील , नकुल जकाते , सर्व विभागाचे प्रमुख अधिकारी, धनंजय हर्षद जन संपर्क अधिकारी यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.