प्रतिष्ठा न्यूज

मारतळा येथे बी-बियाणे व खते जादा दराने विक्रीत व्यापाऱ्यांकडून शेतकऱ्यांची लूट : कृषी विभागाचे साफ दुर्लक्ष

प्रतिष्ठा न्यूज / वसंत सिरसाट
उमरा : लोहा तालुक्यातील मारतळा येथे परिसरसतील अनेक गावासाठी मोठी बाजारपेठ असून सद्या खरीप पिकाची पेरणी करण्यासाठी शेतकऱ्यांनी बाजारात बियाणे व खते खरेदी करण्यासाठी गर्दी केली आहे. मात्र काही कृषीसेवा केंद्राचे व्यापारी मनमानी करत सोयाबीन बियाण्याच्या किमती कमी झाल्या असतांनाही बियाण्याची कृत्रिम टंचाई करत शेतकऱ्यांची मोठया प्रमाणावर लूट करत आहेत. गत वर्षी पेक्षा यंदा प्रत्येक मालाचे भाव कमी झाले असतांनाही दुकानदार मागील खरेदी असल्याचे सांगून विक्री करत आहेत.याकडे तालुका कृषी विभागाचे साफ दुर्लक्ष होत असल्याचे अनेक शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. परंतु कृषी अधिकारी व यांचे भरारी पथकेही इकडे फिरकत नसल्याने आर्थिक लूट सुरू असल्याचे शेतकरी सांगत आहेत.तसेच खरेदी पावत्या मधील रक्कमे मध्ये मोठा फरक दिसून आला आहे. यातूनच शेतकऱ्यांची आर्थिक लूट होतांना दिसत आहे.
याकडे कृषी विभागाने कटाक्षाने लक्ष देने गरजेचे आहे. मारतळा हे तालुक्यापासून शेवटच्या टोकाला असल्यामुळे कृषी खात्याचे याकडे म्हणावे तसे लक्ष नाही. साठेबाजी व टंचाई रोखण्यासाठी नेमलेली भरारी पथके कागदावरच जमा असल्याने शेतकऱ्यांतून संताप व्यक्त होत आहे.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.