प्रतिष्ठा न्यूज

उद्योजक आणि व्यापारी हा समाजातील बुद्धिमान वर्ग : जयभान पवैया; भाजपच्या वतीने सांगलीत बुद्धिमंत मेळावा संपन्न

प्रतिष्ठा न्यूज
सांगली प्रतिनिधी : मोदी @ 9 या अभियानांतर्गत भारतीय जनता पार्टी सांगली जिल्ह्याच्या वतीने आज शुक्रवार दिनांक 23 जून रोजी टिळक स्मारक मंदिर सांगली येथे संध्याकाळी बुद्धिमंत मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. त्यासाठी मध्यप्रदेश चे उच्च शिक्षण मंत्री व माजी खासदार व पश्चिम महाराष्ट्र प्रभारी श्री जयभान पवैया हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
श्री पवैया यांनी बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नऊ वर्षातील केलेल्या कामाचा विस्तृत आढावा घेतला आणि नरेंद्र मोदी यांनी नऊ वर्षांमध्ये भारताच्या आर्थिक, परराष्ट्र, लष्करी, रेल्वे, रस्ते, तसेच व्यापारी व उद्योग क्षेत्रात केलेल्या भरघोस कामाचा मागोवा घेतला.
या मेळाव्याला सांगलीतील विविध क्षेत्रातील मान्यवर मंडळी उपस्थित होती.
या कार्यक्रमांमध्ये खासदार संजय काका पाटील जिल्हाध्यक्ष श्री दीपक बाबा शिंदे तसेच विधानसभा प्रमुख नगरसेवक श्री शेखर इनामदार यांनी आपले विचार मांडले.
तसेच व्यापाऱ्यांच्या वतीने व्यापारी महासंघाचे अध्यक्ष श्री अतुल शहा आणि ट्रान्सपोर्ट असोसिएशन चे अध्यक्ष श्री बाळासाहेब कलशेट्टी यांनी आपले विचार मांडले.
आभार सरचिटणीस केदार खाडीलकर यांनी व्यक्त केले. या कार्यक्रमासाठी विविध व्यापारी संघटनांचे प्रमुख व उद्योजक आवर्जून उपस्थित होते.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.