प्रतिष्ठा न्यूज

तासगावात दलित महासंघाकडून विटा-म्हैसाळ रस्त्यांवरील खड्डयांचे “श्राद्ध” घालून आंदोलन…

प्रतिष्ठा न्यूज/किरण कुंभार
तासगाव : विटा – म्हैसाळ रस्त्यावर खड्डयांचे साम्राज्य निर्माण झाले आहे.खड्डयामुळे अपघातांना निमंत्रण मिळत असून वाहनधारकांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे.वारंवार लेखी,तोंडी तक्रार देऊनही राष्ट्रीय महामार्ग अधिकारी खड्डे भरत नाहीत.तेंव्हा महामार्ग विभागाच्या कारभाराचा व ठेकेदाराचा निषेध करण्यासाठी दलित महासंघाचे (मोहिते गट) वतीने विटा -तासगाव-म्हैसाळ रस्त्यावरील खड्ड्यांची श्राद्ध विधी घालून अनोखे आंदोलन आज करण्यात केले.संघटनचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष तात्यासाहेब देवकुळे,जिल्हाध्यक्ष प्रशांत केदार यांचे नेतूत्वाखाली आंदोलन करण्यात आहे. विटा-तासगाव- म्हैसाळ  हा 65 किमी लांबीचा आहे.परंतु सदर रस्ता अरुंद असून रस्त्यावर वाहतुकीची मोठी वर्दळ आहे.सदर रस्त्यावर मोठ्या खड्डयांचे साम्राज्य पसरले आहे.त्या खड्ड्यातून वाट काढीत सामान्य नागरिक प्रवास करीत आहेत.याबाबत राष्ट्रीय महामार्गचे कोल्हापूर विभागाचे संबधित अधिकारी यांना प्रत्यक्ष भेटून,पत्रव्यवहार करून,फोनवरून खड्डे भरण्याबाबत वारंवार सांगून सुद्धा अधिकारी दखल घेत नाहीत.सामान्य नागरिकांना होणारा त्रासाचे अधिकारी व ठेकेदार यांना काही देणे-घेणे नाही.विटा-म्हैसाळ रस्त्यावरील खड्डे न भरता गंधारीची भूमिका घेत ठेकेदारास जाणीवपूर्वक पाठीशी घातले जात आहे.यापूर्वी अनेकवेळा रस्ता दुरुस्ती नावाखाली ठेकेदार व अधिकारी यांनी कोट्यावधी रुपयांवर डल्ला मारला आहे.त्याचीही चौकशी करावी.विटा-तासगाव-म्हैशाळ रस्त्याचे काम निकृष्ट करून खड्ड्याकडे दुर्लक्ष करून अपघातास कारणीभूत ठरणाऱ्या ठेकेदारावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा.अशी मागणी आंदोलनावेळी प.म.अध्यक्ष तात्यासाहेब देवकुळे,जिल्हाध्यक्ष प्रशांत केदार यांनी केली.यावेळी मेंढपाळ आर्मीचे अर्जुन थोरात,तासगाव तालुकाध्यक्ष आशुतोष देवकूळे,सुशांत देवकुळे,विजय काटे,बंड्या कांबळे,विश्वजित थोरात, सोन्या महाडिक,प्रज्वल थोरात,अजय जाधव,शुभम मलमे,बसू कांबळे, बशीर शेख,तन्मय वावरे,तुकाराम साठे, विराज मदने,आयुष्य तोडकर आदी कार्यकर्ते उपस्थित होते.
मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.