प्रतिष्ठा न्यूज

मंत्रालयातील शालेय शिक्षण सचिवांना जत मधील दहा गावातील मराठी शाळा सुरू करण्याबाबतचे दिले निवेदन : राज्य प्रवक्ते संतोष पाटील

प्रतिष्ठा न्यूज
सांगली प्रतिनिधी : सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यातील अक्कळवाडी, अंकलगी, बालगाव,बेलोडंगी, बोरगी बुद्रुक, कानगरी, करजगी, कानबगी, माणिकनाळ, मोरबगी, या दहा गावात कन्नड प्राथमिक शाळा आहे ,परंतु मराठी प्राथमिक शाळा नाहीत .या मराठी प्राथमिक शाळा नसलेल्या गावांमध्ये व वाड्यावस्ती मिळून 88 पर्यंत आहे. खाजगी शिक्षण संस्था कडून मराठी प्राथमिक शाळेसाठी प्रस्ताव मागितले होते परंतु ते आज पर्यंत लाल फीतीत धुरळा खात पडलेला आहेत. या भागातील लवकरात लवकर ज्या गावांमध्ये प्राथमिक मराठी शाळा नाहीत त्या ठिकाणी प्राथमिक. मराठी शाळा सुरू कराव्यात म्हणून मराठा स्वराज्य संघाचे राज्य प्रवक्ते व दरारा या सामाजिक संघटनेचे अध्यक्ष माननीय संतोष पाटील यांनी महाराष्ट्र राज्याचे शालेय शिक्षण मंत्री नामदार दीपक केसरकर साहेब यांना मंत्रालयातील दालना मध्ये निवेदन देण्यासाठी गेले होते, परंतु नामदार दीपक केसरकर साहेब नसल्यामुळे त्यांचे सचिव व ओ एस डी माननीय प्रवीण मेंढापुरे यांना निवेदन देण्यात आले. त्यावेळेला या निवेदनातील मजकूर वाचून दाखवल्यानंतर शालेय शिक्षण मंत्रालयातील विभागांमध्ये जत तालुक्यात म्हणजे महाराष्ट्रातील काही तालुक्यांमध्ये मराठी शाळा नसल्याचे आश्चर्य व्यक्त करण्यात आले. त्यामुळे त्यांनी तुमच्या दिलेल्या निवेदनाचा शालेय शिक्षण मंत्री नामदार दीपक केसरकर साहेब यांना आल्यानंतर त्यांना निवेदन दिले जाईल व मंत्री महोदय यावर विचार करून लवकरात लवकर त्या जत तालुक्यातील गावांमध्ये व वाड्या वस्त्या वर लवकरच मराठी प्राथमिक शाळा सुरू करण्याची अंमलबजावणी करतील असे आम्हाला आश्वासन दिले.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.